"रडून काही होणार नाही, मॅडम उत्तरं द्यावीच लागतील"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2020
Total Views |
dipika_1  H x W
 
 


चौकशी दरम्यान दीपिका वापरतेय 'इमोशनल कार्ड'

मुंबई : नारकोटीक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शनिवारी अभिनेत्री दीपिका पदुकोणची सहा तास चौकशी केली. मात्र, तिच्या चौकशीवेळी ती एकदा दोनदा नव्हे तर तीनदा रडू कोसळले होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यानी दीपिकाला 'इमोशनल कार्ड' वापरू नको, उत्तरे द्यावीच लागतील, असा सल्ला दिला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दीपिकाच्या डोळ्यात अश्रू पाहून अधिकाऱ्यांनी तिच्यासमोर हात जोडले. आमच्यासमोर डोळे ओले करण्यापेक्षा खरं काय ते सांगा, तेच तुमच्यासाठी चांगले आहे, असा इशारा दिला आहे.
 
 
ड्रग्ज चॅटची कबुली
 
एनसीबी चौकशीत दीपिकाने ड्रग्ज चॅट करण्याची कबुली दिली आहे. मात्र, मी ड्रग्ज घेतले नाही या वक्तव्यावर दीपिका ठाम होती. दीपिका अशा व्हॉटसअॅप ग्रुपची अॅडमीन आहे तिथे तिचे सहकारी सिगरेटचे सेवन करतात. त्यात नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे सेवन केले जाते.
 
 
या प्रश्नाचे उत्तर दीपिकाकडे नाही
 
एनसीबीने ड्रग्ज चॅटमध्ये आलेल्या हशीश या शब्दाबद्दल विचारले होते. त्यावर दीपिकाला उत्तर देता आली नाही. दीपिका तू डूप घेतेस का या प्रश्नावरही तिला उत्तर देता आले नाही. दीपिकाच्या उत्तरावर अधिकारी स्पष्ट नसल्याचे दिसून येत आहेत.
 
 
दोन फोन जप्त
 
अधिकाऱ्याच्या मते, दीपिका एनसीबी कार्यालयात पोहोचल्यानंतर तिला तिच्यावरील आरोपांबद्दल सांगण्यात आले. डेटा बॅकअप करण्यासाठी तिचे दोन्ही फोन घेतले गेले. तसेच या प्रकरणातील कुठल्याही संशयित आरोपीशी न बोलण्याची सूचनाही अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर दीपिकाला एका अंडरस्टेकींगवर हस्ताक्षर करण्यास सांगितले आहे. दीपिकाची तीन टप्प्यात चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे आणखी तीन ते चार वेळा दीपिकाला कार्यालयात हजर रहावे लागू शकते.
 
 
ड्रग्ज प्रकरणात दीपिकाचे नाव कसे आले ?
 
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग्जमध्ये एनसीबीच्या हाती तीन वर्षांपूर्वीचे व्हॉट्सअॅप चॅट लागले आहेत. ग्रुपचॅट 28 ऑक्टोबर २०१७ रोजीचे होते. दीपिका, तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश, सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया सहा यांच्यात ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. चॅटमध्ये दीपिका हॅश, वीड या शब्दांचा उल्लेख करत होती. करिश्माकडे माल आहे का म्हणून विचारत होती. त्यानंतर दोघींना एनसीबीने समन्स बजावले होते. या व्हॉट्सअॅप ग्रुपची मॅनेजर दीपिका होती.
 
 
न्यायालयीन प्रक्रीया प्रलंबित
 
शनिवारी एनसीबीने दीपिका व्यतिरीक्त सारा अली खान, श्रद्धा कपूरचीही चौकशी केली. एका दिवसापूर्वीच रकुल प्रीत सिंह हीचीही चौकशी झाली होती. अधिकाऱ्यांच्या मते, नोंदवण्यात आलेला जबाब न्यायालयात दाखल केला जाणार आहे. या प्रकरणी अद्याप १८-१९ लोकांना अटक झाली आहे. 
@@AUTHORINFO_V1@@