'पॉझिटीव्ह गोष्ट' : बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2020
Total Views |
covid 19_1  H x
 
 


आठ दिवसांत सात वेळा झाला आहे विक्रम

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या आकडेवारीतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नऊ दिवसांत आठ वेळा कोरोना संक्रमितांपेक्षा उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण आढळत आहेत. हेच प्रमाण आणखी काही महिने कायम राहिले तर कोरोनावर मात करणे सहज शक्य होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.गेल्या आठवड्यात गुरुवारीच केवळ कोरोना संक्रमितांची संख्या अधिक होती. पाच दिवसांत तीन ११ लाखहून अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. कोरोना संक्रमितांची संख्या ९० हजारांहून अधिक होते. शनिवारी कोरोना संक्रमितांचा आकडा हा ८८ हजार ७५९ इतका पोहोचला.
 
 
कोरोना संक्रमण झालेले ९२ हजार ३५९ रुग्ण बरे झाले. ११२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आत्तापर्यंत एकूण ५९.८० लाख कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४९.३८ लाख कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यू ९४ हजार ५३४ इतके आहेत. ९ लाख ५६ हजार ५११ रुग्णांवर सध्या देशात उपचार सुरू आहेत. covid19india.org या संकेतस्थळानुसार ही माहिती उघड झाली आहे.
 
कोरोना महामारी संदर्भातील महत्वाचे अपडेट्स
 
...तर आयपीएल वेळापत्रकात होऊ शकतो बदल
 
इंटरनेशनल क्रिकेट काऊन्सिलच्या (आयसीसी) दुबई कार्यालयात एक कर्मतारी कोरोना बाधित आढळला आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळे आयपीएलवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
पश्चिम बंगालमध्ये सिनेमागृह सुरू
 
पश्चिम बंगालमध्ये १ ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ‘जतरास, प्ले, ओएटी, सिनेमा, संगीत आणि नृत्य कार्यक्रम, मॅजिक शो यांना १ ऑक्टोबरपासून जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
देशात प्रतिदिन बनवली जातात पाच लाखांहून जास्त किट्स
 
आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी महत्वाची माहिती दिली आहे. देशात ११० कंपन्या पीपीई किट्स बनवत आहेत. पाच लाखांहून जास्त पीपीई किट्स प्रतिदीन बनवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
बनावट लस तयार करणाऱ्याला अटक
 
ओडिशाच्या बारागड जिल्ह्यात कोरोनाची बनावट लस तयार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. केवळ १२वी शिकवेला प्रल्हाद बिसी (32) व्यक्ती लस बनवत होता. त्याबद्दल पोलीसांत तक्रार केल्यानंतर त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
 
 
जगात एकूण ९.९० लाख कोरोना मृत्यू
 
जगभरात कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची एकूण संख्या ९.९० लाख इतकी झाली आहे. ही संख्या एक कोटीवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
 
उमा भारती कोरोना पॉझिटीव्ह
 
माजी केंद्रीय मंत्री व मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करून या बद्द्ल माहिती दिली आहे. त्या सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर होत्या.
 
 
चाचणी नंतर इतक्या टक्के रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह
 
देशात आता ७ कोटी १२ लाखांहून लोकांची चाचणी झाली आहे. त्यात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे ८.३३ टक्के इतके आहे. प्रति दहा लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणी ५० हजार ८०३ जणांची चाचणी केली जात आहे. त्यात सरासरी ४२०० रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळत आहेत.
 
 
कोरोना लस देण्यासाठी सरकारला इतक्या निधीची गरज
 
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी कोरोना विषाणू लसीबद्दल सरकारला एक प्रश्न विचारला आहे. केंद्र सरकारकडे कोरोना लसीच्या खरेदी आणि वितरणासाठी एका वर्षात एकूण ८० हजार कोटी रुपये आहेत. लस खरेदी केल्यानंतर आता कोरोना लस आल्यावर ती देशभरात पुरवठा करण्यासाठी इतक्या निधीची गरज असल्याचे पूनावाला यांनी म्हटले आहे.


@@AUTHORINFO_V1@@