मुलाखत घ्याल पण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2020   
Total Views |

samanaa_1  H x



मी त्यांना विचारले की, “मुलाखत द्याहो,” असे विचारायला भेट घेतली. “तुम्ही जरी मी लिहिलेले काही वाचत नसाल तरी द्या मुलाखत. का बरं, आमच्या साहेबांची मुलाखत घेऊन त्यांच्यावरच लोकांना हसण्याची संधी देऊ. सर्वांना समान संधी. यावेळी तुम्हाला पण असेच भारी प्रश्न विचारेन.” आता यावर काही जणांचे म्हणणे, “तुम्ही त्यांची मुलाखत घ्याल हो. पण, त्यांनी तुम्हाला मुलाखत दिली पाहिजे ना? सर्वात महत्त्वाचे ते अभ्यास करून येतील. त्यांना तुम्ही कोणताही प्रश्न विचाराल तर त्याची हजार उत्तरं त्यांच्याकडे असतील. पण हो, मुलाखत घेतलीच तर राजकीय प्रश्न विचारू नका बरं. कारण, ते जरी नाही म्हटले तरी महाराष्ट्रात तुमच्या सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, सगळा महाराष्ट्र त्यांच्यावतीने तुम्हाला उत्तर देईल, ‘तो पुन्हा येईल, तो पुन्हा येईल."



“मी मुलाखत घेतो, तुम्ही द्याल का?” असे मी त्यांना विचारले हो, बाकी काही नाही. मग ‘हू’ला सल्ला देणार्‍या अफाट कर्तृत्ववान आणि संशोधनशील वृत्ती असलेल्या माणसाची मी मुलाखत घेतो. त्यांची मुलाखत घेताना कसली रंगते मुलाखत. लोक पार आपलं सुख-दुःख विसरून खळखळून हसतात. आता आमच्या मुलाखतीमध्ये हसण्यासारखे काय असते देव जाणे. पण, सगळे आपले हसत असतात. त्यानंतर काल-परवा तर ज्यांना आमचे दैवत, ‘मैद्याचे पोते’ अन् असंच काही बाही बोलायचे आणि ते आम्हाला इमानी पाळीव प्राण्याची संज्ञा द्यायचे, तर त्यांचीही मी मुलाखत घेतली. दोस्त असो, दुश्मन असो; पण तो साहेबच असला पाहिजे, तरच मी त्यांची मुलाखत घेतो. तर मी अशा मुलाखती घेतो. त्यासाठी मी फक्त त्यांना भेटलो. तर लोकांनी कायच्या काय अर्थ काढला. महाबिघाडी माफ करा, महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी पण मी असेच काय काय केले, अगदी लीलावती हॉस्पिटलच्या खाटेला विचारा. तिथेही लोकांचे म्हणणे की, माझे नाटक आहे. शस्त्रक्रिया वगैरे काही झाली नाही. पण, मी ‘करून दाखवलंच.’ साहेबांना दिल्ली आणि बारामतीच्या दरबारात नेलेच. त्यानंतर बदल तर झाला. आता लोकांना काय कपाळ सांगायचे की, “बाबांनो हम तो कठपुतली हैं, दोरी तर मालकांच्या हाती आहे. दोरीची एक बाजू वांद्य्राला तर एक बाजू बारामतीला. त्यातही बारामतीच्या पैलवानाची ताकद जास्तच.” तर असो, मी त्यांना विचारले की, “मुलाखत द्याहो,” असे विचारायला भेट घेतली. “तुम्ही जरी मी लिहिलेले काही वाचत नसाल तरी द्या मुलाखत. का बरं, आमच्या साहेबांची मुलाखत घेऊन त्यांच्यावरच लोकांना हसण्याची संधी देऊ. सर्वांना समान संधी. यावेळी तुम्हाला पण असेच भारी प्रश्न विचारेन.” आता यावर काही जणांचे म्हणणे, “तुम्ही त्यांची मुलाखत घ्याल हो. पण, त्यांनी तुम्हाला मुलाखत दिली पाहिजे ना? सर्वात महत्त्वाचे ते अभ्यास करून येतील. त्यांना तुम्ही कोणताही प्रश्न विचाराल तर त्याची हजार उत्तरं त्यांच्याकडे असतील. पण हो, मुलाखत घेतलीच तर राजकीय प्रश्न विचारू नका बरं. कारण, ते जरी नाही म्हटले तरी महाराष्ट्रात तुमच्या सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, सगळा महाराष्ट्र त्यांच्यावतीने तुम्हाला उत्तर देईल, ‘तो पुन्हा येईल, तो पुन्हा येईल.”’


राजकुमार, एक चिंतातुर जंतू


‘गोविंदाग्रज’ यांची ‘चिंतातुर जंतू’ कविता अजरामर आहे. कवितेमधल्या चिंतातुर जंतूला असे प्रश्न पडतात की, त्या प्रश्नांचा त्याच्याशी दुरूनही संबंध नव्हता. हा चिंतातुर जंतू आजही सगळीकडे आहे. हे असे असेल, तर ते तसे का नाही? आणि ते तसे का, तर ते तसेच का? असा चिंता करणारा हा जीव. तर या जीवाची आठवण येण्याचे कारण की, आता कोरोनाची लस निर्माण झाली तर त्या लसीच्या उत्पादनाची आणि वितरणाची जबाबदारी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने घेतली आहे. लस तयार झाली की भारतभर लसीच्या वितरणासाठी ८० हजार कोटींचा खर्च येणार आहे. तर याबाबत तयारी काय? असे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी ट्विट केले. तर राहुल गांधींनी चिंतेसाठी हा मुद्दा उचलला आहे.भारतात कोरोनाचे आगमन होण्याआधी हे महाशय आजोळी इटलीला जाऊन आले. नंतर भारतातील कोरोनाबाबत म्हणाले, “देशात त्सुनामी येणार, त्सुनामी.” (हे सांगताना दुःख म्हणण्यापेक्षा देशात कसा हाहाकार उडेल याचे स्वप्नरंजन जास्त होते.) स्वातंत्र्याआधीही यांचे घराणे म्हणे पैशाने श्रीमंत. पण, कोरोनाकाळात कुठे काय स्वत:च्या खिशा-पाकिटातून देशाला यांनी मदत केली, असे काही दिसले नाही. आता त्यांनी पुनावाला यांच्या प्रश्नावरून जी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हणे पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला आहे की, “सांगा कुठून आणणार इतके पैसे?” आता यावर अवघ्या देशवासीयांचे म्हणणे आहे की, इतके पैसे मोदी आणि पर्यायाने देश कुठून आणेल याची चिंता जर राजकुमारांना सतावते आहे. तर राजकुमारांचे खानदान आणि संबंधित बहुतेक सारेच जण आर्थिक बाबतीत सक्षम आहेत. त्यांनी हा खर्च उचलण्याची जबाबदारी घ्यावी;अर्थात हे होणे नाही. कारण, चिंता व्यक्त करून बाष्पळ बडबड करायला काय जाते? ‘गोविंदाग्रज’ चिंतातुर जंतूबाबत योग्यच म्हणालेत,
“देवा, तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी।
या चिंतातुर जंतूंना एकदा मुक्ती द्या परी”
(अर्थात राजकुमारांना चिंतेतून मुक्ती द्यावी असा आपण अर्थ घ्यायचा आहे बरं)
@@AUTHORINFO_V1@@