भाजपला बळकटी देणारा द्रष्टा नेता : जसवंत सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2020
Total Views |

jaswant singh_1 &nbs



नवी दिल्ली :
माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. गेल्या सहा वर्षांपासून कोमात असलेले माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे रविवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. २०१४ साली जसवंत सिंह हे त्यांच्या निवासस्थानी पडले होते. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून जसवंत सिंह यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी यांचे निधन झाले.



१९६० मध्ये लष्करातील मेजर पदाचा राजीनामा देऊन जसवंत सिंह यांनी राजकारणात प्रवेश केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमधील कारकीर्दीत ते अव्वल मंत्री होते. १९९८ ते २००४ च्या कार्यकाळात जसवंत सिंह हे अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती.जसवंत सिंह हे अटलबिहारी वाजपेयींचे निकटवर्तीय आणि विश्वासू होते. ब्रजेश मिश्र आणि प्रमोद महाजन यांच्यासह वाजपेयींच्या टीमचे ते महत्त्वाचे सदस्य होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना हनुमान म्हणत. माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह, अटल यांचे विश्वासू, त्यांच्या सरकारच्या काळात नेहमीच समस्या निवारकाच्या भूमिकेत दिसले. माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी आणि त्यांच्या सरकारमधील मंत्री जसवंत सिंग यांच्या मैत्रीच्या अनेक किस्से राजकारणात प्रसिद्ध आहेत. अटल सरकारच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांना पंतप्रधानांना आपला मुद्दा सांगण्यासाठी जसवंतसिंग यांचा पाठिंबा घ्यावा लागत. १९९८ साली जेव्हा अटल सरकारने पोखरण अणुचाचणी घेतली तेव्हा भारताला आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागला. त्यावेळी जसवंतसिंग यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भूमिकेत जगातील बऱ्याच देशांत जाऊन अटल सरकारच्या बाजूने वातावरण निर्माण केले होते. त्याच्या परिश्रमाचा परिणामही नंतर दिसून आला. जगातील देशांनी भारताच्या आण्विक चाचण्या मान्य केल्या आणि आर्थिक निर्बंधही हटवले गेले. यामुळेच अटलबिहारी वाजपेयी त्यांना संकट मोचन हनुमान म्हणत राहिले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “ जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार व समर्थकांच्या बरोबर आहे.” जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वटिमध्ये म्हटले की, "जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे. राजकारण आणि समाजातील विविध मुद्यांवरील अद्वितीय दृष्टिकोनासाठी जसवंत सिंह यांची आठवण काढली जाईल. त्यांनी भाजपाला बळकट करण्यासाठी देखील मोठे योगदान दिले. मी सदैव आमच्यात झालेला संवाद स्मरणात ठेवेल. त्यांचा परिवार व समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे” असं देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. जसवंत सिंह यांना दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात २५ जूनला दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाले होते. हृदयविकाराचा झटका आल्याने रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्याची करोना चाचणी केली गेली होती. चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
@@AUTHORINFO_V1@@