'शिवसेना उपद्रवी ; कधीही विश्वासघात करू शकते'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2020
Total Views |

sanjay nirupam_1 &nb



मुंबई :
राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, याबद्दल जोरदार चर्चा झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रस अलर्ट मोडमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी जोरदार टीका केली आहे.



निरुपम यांनी शिवसेनेला थेट लक्ष्य केले आहे. 'शिवसेना ज्यांच्यासोबत असते, त्यांच्यासोबत ती असते आणि नसतेही. अशा प्रकारे ते उपद्रव करतात. काँग्रेसने सत्तेसाठी आपला विचार, व्यवहार सोडला आणि शिवसेनेसोबत आघाडी केली. याबद्दल मी आधीपासूनच पक्षाला सतर्क करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ज्यांच्यासोबत नातं निभावताय, ते नातं निभावणारे नाहीत. ते कधीही विश्वासघात करू शकतात, हे मी वारंवार सांगितलं आहे,' असे निरुपम यांनी म्हंटले आहे. ते पुढे म्हणतात," काँग्रेस देशभरातील शेतकरी आंदोलनाचे समर्थन करत आहे.परंतु शिवसेनेने लोकसभेत शेतकरी विधेयकाला पाठिंबा दर्शविला आणि राज्यसभेत मतदानाच्या वेळी त्यांनी संसदेमधून बाहेर पडण्याची संधी दिली. शिवसेना नेहमी उपद्रव निर्माण करते. त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही."




भाजपला सत्ता स्थापनेची घाई नाही, हे सरकार स्वत:च्या कृतींमुळेच कोसळेल, या विधानांचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 'संजय राऊत यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबद्दल भाजपची कुठलीही चर्चा नाही. तशी चर्चा करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारच्या कामाबद्दल जनतेच्या मनात आक्रोश आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरण्याचं काम आम्ही करत आहोत. हे सरकार आपल्या स्वत:च्या कृतीनं खाली कोसळेल. त्यावेळी काय करायचं ते तेव्हा बघू. सरकार स्थापनेची आम्हाला कुठलीही घाई नाही,' असे विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.


@@AUTHORINFO_V1@@