भेटीमागे 'हे' आहे कारण...चर्चांना पूर्णविराम !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Sep-2020
Total Views |

samanaa_1  H x



मुंबई :
आज सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात भेट झाल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आले. मात्र, भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या भेटीचा खुलासा करत या भेटीमागे कोणतेही राजकीय संदर्भ नसल्याचे स्पष्ट केले.





ट्विट करत केशव उपाध्ये यांनी माहिती दिली. ते म्हणतात, "माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही." असे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला.


दरम्यान,सांताक्रूज येथील सप्ततारांकीत हॉटेल ग्रॅड हयात येथे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास बैठक झाली. दुपारी दीड ते साडे तीन तास चर्चा झाली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता.मात्र, राऊत यांनी फडणवीसांशी भेट झाल्याचा वृत्ताचा इन्कार केला असला तरी पुढच्या आठवड्यात दैनिक ‘सामना’मध्ये फडणवीस यांची मुलाखत छापून येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
@@AUTHORINFO_V1@@