'मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर बरं वाटलं असतं'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2020
Total Views |

sharad pawar vinod tawade



अहमदनगर:
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन गोंधळ सुरु आहे. या कृषीविधेयकावरुनही विनोद तावडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील एक दिवसभर अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली, त्यावेळी शरद पवार यांनी अन्नत्याग केला असता तर मराठा समाजातील तरुणांना बरे वाटले असते, अशी टीका भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे.



'मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर दोन दिवसात राज्य सरकार १८ हजार पोलीस भरतीचा निर्णय करते. त्यावरूनच सरकारची नियत काय आहे व सरकार मराठा समाजाला कसे डावलते आहे, हे दिसून येतंय,' असा आरोप ही त्यांनी केला. दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कृषि विधेयकावरून तावडे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.


ते म्हणतात, 'शरद पवार साहेब स्वतः कृषिमंत्री होते. पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते. शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण केवळ विरोधासाठी विरोध शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री व ज्येष्ठ नेत्याने करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही,' असेही तावडे यांनी स्पष्ट केले.पुढे ते म्हणतात, कृषी विषयक विधेयक नीट पाहिले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना मोदी सरकारने आणली आहे. यामध्ये ज्या शंका उपस्थित केल्या जात आहेत, त्या शंकांना उत्तर तत्कालीन सरकारच्या काळातच कपिल सिब्बल यांनी संसदेत दिले होते. त्यावेळी ते मंत्री होते. त्यामुळे शेतकऱ्याची दिशाभूल करणे , उगाच नको त्या शंका उपस्थित करणे, शेतकऱ्यांना घाबरवणे, शेतकऱ्यांना जसे वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना पिचत ठेवले आहे, तसेच पिचत ठेवण्याचे काम दुर्दैवाने विरोधी पक्ष करत आहे.
@@AUTHORINFO_V1@@