मनी असे ते ओठी येता राहिले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Sep-2020   
Total Views |


NAshik_1  H x W



राज्याच्या सत्तेच्या त्रिकुटात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मोठी आहे. या पक्षाच्या ‘भुजात बळ’ निर्माण करण्यात नाशिकच्या ‘मंत्री’ असलेल्या ‘पालकांचा’ मोठा वाटा आहे. मात्र, या पालकांबद्दल राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजी आहे. ही नेमकी नाराजी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मंत्री जयंत पाटील यांनी शासकीय बैठकीच्या आड नुकताच नाशिक दौरा केला. निमित्त जरी शासकीय कामाचे असले तरी, हेतू हा पालकमंत्र्यांच्या प्रती कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, हे जाणून घेणे हाच होता. यावेळी आमदारांसह, पक्षाचे पदाधिकारी यांची खुद्द ‘पालकत्व’ स्वीकारलेल्या नेत्यावरच खप्पा मर्जी असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपली नाराजी पाटील यांच्या कानावार घालण्यासाठी स्थानिक नेते मंडळी आग्रही होती. मात्र, ज्या पालकांच्या बाबत आपले मत मांडायचे आहे, ते सावलीसारखे पाटील यांच्याबरोबर या दौर्‍यात असल्याने ‘मनी जे आहे ते ओठी येता येता राहिले’ अशीच गत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची यावेळी झाली. पाटील यांच्या दौर्‍यात या तक्रारी जरी या नेत्यांना मांडता आल्या नसल्या तरी, आगामी काळात नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या गोटात राजकीय भूकंप होण्याची चाहूल नक्कीच दिसून आली. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पाच आमदार आहेत. मात्र, आमच्यापेक्षा विरोधी पक्षांच्या आमदारांवर कृपा करत त्यांचे ‘कमळ’ फुलविले जाते. निधीचा ओघ आमच्याकडे येतच नाही. त्यासाठी शहरातील भाजपचे मात्र सध्या शिवसेनावासी झालेल्या माजी आमदाराच्या स्वीय साहाय्यकाची लुडबूड कारणीभूत आहे, आदी तक्रारी स्थानिक नेत्यांच्या पोटात होत्या, अशी राजकीय गोटात चर्चा आहे. या तक्रारी थेट पक्षाध्यक्षांकडे पोहोचविण्यात आल्याचे बोलले जाते. त्यासाठी मुंबईत एक बैठकही झाली. त्यातील सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चाचपणीसाठी नाशिकला आल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काही आमदारांसह प्रमुख पदाधिकारी यांचा असादेखील आक्षेप आहे की, नाशिक मनपामध्ये अनेक वादग्रस्त प्रकल्पांबाबत नगरसेवक, राजकीय पक्षांची ओरड असताना, यातील एकही प्रकल्प थांबला नाही. राज्य सरकारकडून त्याला सुखनैव मान्यता मिळत आहे. त्यामुळे तीन पक्षांच्या सरकारमध्ये अंतर्गत असणार संघर्ष यातून दिसून आला.
 
 
मनपाचे ‘आरोग्यस्नेही’ धोरण


 
राज्य सरकारने जरी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सुरु केली असली तरी, त्याचे यशापयश हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यावर अवलंबून आहे. राज्यात सरकार कोणाचेही असो, मात्र नागरिकंच्या आरोग्याचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. सत्यामुळे केवळ विरोध करण्यापेक्षा नाशिक मनपाने १९ लाख नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरुवात शहरातील सर्व विभागांमध्ये एकाच वेळी करण्यात आली आहे. या माध्यमातून कोविडमुक्त नाशिक करण्यासाठी ८०० पथके शहरातील सर्व घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करणार आहेत. १५ सप्टेंबरपासून दोन टप्प्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार, अवयव प्रत्यारोपण, दमा आदी आजारांबाबत माहिती संकलित केली जाणार आहे. या मोहिमेसाठी ७९४ पथके नियुक्त केले आहेत. त्यात विभागनिहाय पथकांमध्ये नाशिक पूर्व १५२ पथके व ८३,६०१ घरे आणि ३,६१,०६६ नागरिक, नाशिक पश्चिम विभागात १०५ पथके ५१,३१२ घरांमधील २,३२,४९९ नागरिक, पंचवटी विभागात ९९ पथके ५६,७४९ घरांमधील २,६४,२५६ नागरिक, नाशिक रोडला १४३ पथके ६०,७४३ घरांमधील ३,१०,७४० नागरिक, सिडको विभागात १५४ पथके १,०५,८५० घरांमधील ४,२४,७७० नागरिक, सातपूर विभागात १४१ पथके ८२,३०३ घरांमधील ३,०८,३६२ नागरिकांची अशी शहरातील ४,४०,५५८ घरातील १९,01,६९३ नागरिकांची ७९४ पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे व सॅनिटायझरचा वापर करावा, या त्रिसूत्रीचे प्रबोधन केले जाणार आहे. केंद्र शासनाने कोरोनाबाबत काही नियम अथवा योजना हाती घेतली असता, त्याला केवळ विरोधच करणे असे धोरण मागील काही दिवसांत राज्य शासनाचे दिसून आले. याउलट राज्य शासनाने जे सांगितले, ते योग्यच असणार आणि विचारपूर्वक हा निर्णय झालेला असणार असे धोरण उराशी बाळगून नाशिक मनपा कार्यरत आहे. जेव्हा की नाशिक मनपामध्ये भाजप सत्तेत आहे. नाशिक मनपाने आरोग्यस्नेही धोरण आखत आपण मानाने आणि विचाराने कोते नसल्याचेच राज्य शासनाला दाखवून दिले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@