बँकेतून अलर्टही मिळाला नाही : 'ऑनलाईन' दरोड्यात ३५ लाख लंपास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2020
Total Views |
YES Bank_1  H x
(संग्रहित छायाचित्र)
मुंबई : कोरोना काळात डिजिटल व्यवहरांना प्रोत्साहन मिळावे, अशी मागणी वेळोवेळी होत असते. मात्र, गेल्या काही महिन्यांत ऑनलाईन दरोडेखोरांनी खातेधारकांचे लाखो रुपये वळते केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. तुमचा मोबाईल फोन बंद असेल तरीही तुमचे पैसे ऑनलाईन ट्रानस्फर करून खाते रिकामी करणारी टोळकी सक्रीय झाली आहेत. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर कुठला अलर्ट येणार नाही किंवा तुमच्या फोनवर ओटीपीही येणार नाही. येस बँकेच्या एका ग्राहकाच्या खात्यावर असाच एक दरोडा पडला आहे. खात्यातून ३५ लाख वळते केले आहेत. या चोरीचा आत्तापर्यंत पत्ता लागलेला नाही.
 
 
एकाच दिवशी दोन तीनदा झाले लाखो व्यवहार
 
दिल्लीतील राजेंद्र प्लेस येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक प्रवीण नांगिया यांची येस बँकेत तीन खाती आहेत. एक बचत खाते तर दोन ओएचयूएफ आहेत. या सर्वांचा ऑनलाईन लॉईन आयडी पासवर्ड वेगवेगळे आहेत. ३ नोव्हेंबर रोजी बचत खात्यातून १० लाख वळते झाले. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी सात लाख वळते होऊन एचडीएफसी बँकेतील अभय कुमारच्या खात्यात वळते होतात. त्या संदर्भात कुठलाही अलर्ट मिळत नाही. ४ नोव्हेंबर रोजी तीन लाख आयसीआयसी बँकेत खाते असणाऱ्या रामूच्या खात्यावर वळते झाले. त्यानंतर अन्य बचत खात्यातून चार वेळा व्यवहार झाले. ४० हजार पुन्हा रामूच्या खात्यात वळते झाले. अशा प्रकारे एकूण ३५ लाखांचा ऑनलाईन गंडा यात घालण्यात आला.
 
 
बँकेच्या ऑम्बटसमॅनकडूनही मिळाला नाही दिलासा
 
पुढील वर्षी प्रवीण नांगिया यांनी बँक आणि पोलीसांत तक्रार दाखल केली. येस बँकेच्या ऑम्बटसमॅनकडे वारंवार तगादा लावला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आरबीआयकडे ऑम्बटसमॅन विरोधात तक्रार केली. मात्र, बँकेने नांगिया यांची एकही तक्रार ऐकून घेतलेली नाही. अंतर्गत चौकशी सुरू आहे, हे एकच उत्तर येस बँकेने दिले आहे. ग्राहकावरच याविरोधात आरोप लावण्यात आला आहे. आपला पासवर्ड गोपनीय न ठेवल्याने ही फसवणूक झाल्याचे बँकेने म्हटले आहे. त्यानंतर बँकेकडून एक ईमेल आला. तुम्हीच तुमच्या ग्राहकांशी पासवर्ड शेअर केल्याने ही वेळ आली आहे, त्यामुळे आम्ही चौकशी थांबवत आहोत, असे बँकेने म्हटले आहे.
 
 
बँकेने मुंबईत घडलेल्या एका ऑनलाईन फसवणूकीतही असेच उत्तर दिले आहे. एका ग्राहकाचे विविध आयडी पासवर्ड असताना सर्वच खात्यातून पैसे कसे वळते झाले. हे शक्य नाही, असा दावा नांगिया यांनी केला आहे. ज्यावेळी हे व्यवहार झाले त्यावेळी सीमकार्ड सुरू नव्हते. काम करत नव्हते. ओटीपी जनरेट झाल्यानंतरच हे व्यवहार झाले आहेत. त्या प्रकरणात माझ्या मोबाईलवर ना कुठला ओटीपी आला किंवा व्यवहार झाल्याचा कुठलाही एसएमएस.
 
 
 
या प्रकरणी त्यांनी आता बँकेकडे आपली रक्कम परत मागितली आहे. ज्यांच्या खात्यात पैसे गेले आहेत, त्याचीही माहिती बँकेकडे आहे मग बँक ते परत मागण्यासाठी कचरत का आहे, याचीही माहिती दिली जात नाही. आयपी अॅड्रेस आणि लोकेशनचीही चौकशी बँकेने केलेली नाही. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांना आयडी पासवर्ड आणि अन्य खात्यातील शिल्लक ही सर्व माहिती होती.
 
 
याच शाखेतून झाले होते तीस लाख गायब
 
 
यापूर्वी याच शाखेतून राजेश आनंद यांचे तीस लाख रुपये अशाच प्रकारे लुटण्यात आले होते. कोरोना काळात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याचा फायदा हे चोर करत आहेत. बँकांनी ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित ठेवायला नको का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
 
 
काय खबरदारी घ्याल ?
 
 
ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी वापरणाऱ्या खात्यात कमी शिल्लक ठेवा. आपले पासबूक आणि बँकेचे स्टेटमेंट वारंवार पडताळत रहा. जिथे विश्वासार्हता नसेल, अशा ठिकाणी डिजिटल व्यवहारांचा वापर करणे टाळा. जिथे अशी फसवणूक होत आहे, अशा बँकांमध्ये खाते न उघडलेलेच बरे. ग्राहकांना त्यांच्या ठेवीसाठी देण्यात येणाऱ्या विम्याबद्दल आणि अन्य सुरक्षेबद्दल खात्री करून घ्यायला हवी. बँकींग पासवर्ड आणि ओटीपी कुणालाही देऊ नयेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@