पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती विशेष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2020
Total Views |




एकात्म मानववाद भारतात रुजवणारा नेता म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची भारतीय जनमानसात ओळख आहे. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१६, रोजी चंद्रभान गाव, नगला, मथुरा या ठिकाणी झाला. बालपणीच ज्योतिषाने पाहिली होती कुंडली. मुलगा विद्वान बनेल, अग्रणी राजनेता बनेल, आजन्म अविवाहित राहून नि:स्वार्थ देशसेवा करेल, असे उद्गार जोतिष्याने काढले होते. 
 
सुदैवाने ते खरे ठरले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी राजस्थान-सीकर येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांची हुशारी पाहून सुवर्णपदक, २५० रुपये शिष्यवृत्ती मिळाली. इंटरमिजिएट परीक्षा पिलानी येथे उत्तीर्ण झाले. सनातन धर्म महाविद्यालयातून केले बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. १९३६ रोजी बळवंत महाशब्देंकडून प्रेरणा घेत रा.स्व.संघात प्रवेश केला. त्यापूर्वी पंडित दीनदयाळ उपाध्याय बी.ए. प्रथम श्रेणी उत्तीर्ण एम.ए.साठी आग्र्याला रवाना झाले. एस.डी. कॉलेज, कानपूरमध्ये पुढील शिक्षणासाठी घेतला प्रवेश घेतला. आग्र्यात नानाजी देशमुख व भाऊ जुगडेंशी परिचय झाला. जनसंघाची पाळेमुळे मजबूत करणाऱ्यांपैकी ते प्रमुख नेते होते. डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्यानंतर १६ वर्षे परिश्रमातून जनसंघाची उभारणी केली. पंडित दीनदयाल उपाध्याय देशाला एकात्म मानववादाचा सिद्धांत दिला. भारतीय जनता पक्ष आज त्याला आपली विचारधारा मानतो. एकात्म मानवतावाद हा भारतीय संस्कृतीचेच रूप आहे.


संघात सुंदरसिंह भंडारी, बळवंत महासिंघेंसह अनेकांचा परिचय झाला. जनसंघ स्थापनेपासून १९६७ पर्यंत महासचिव पदाची धुरा सांभाळली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जींचा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर दृढविश्वास होता. १९६७ मध्ये जनसंघाच्या १४ व्या अधिवेशनात कालिकत येथे जनसंघाचे अध्यक्ष बनले. महान लेखक म्हणूनही त्यांचा परिचय केला जातो. 'पांचजन्य', 'स्वदेश', 'राष्ट्रधर्म' नियतकालिकांतून त्यांची लेखणी उजळली. चंद्रगुप्त मौर्य, शंकराचार्यांचे हिंदीतील चरित्र लिहिले. रा. स्व. संघ संस्थापक हेडगेवार यांचे हिंदीतील चरित्र लिहिले.  संपूर्ण जग हे भांडवलशाही आणि साम्यवादावर वादविवाद करत होते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी तेव्हा याचा सूवर्णमध्य साधत एकात्म मानववाद मांडला. धर्म, अर्थ, काम मोक्षाकडे नेण्यासाठी असतात हा विचारही एकात्मवादात मांडला आहे.


मोदी सरकारच्या योजना सारकारण्यामागेही एकात्म मानवतावाद आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, स्टार्टअप इंडिया, मुद्रा बॅंक योजना, दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, मुद्रा बॅंक योजना, मेक इन इंडिया आदी योजनांमध्येही एकात्मवादाचा विचार केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सबका साथ सबका विकास ही घोषणाही एकात्मवादाच्या विचारातून आली. ६० वर्षांपूर्वी मांडलेली एकात्म मानवतावादाची संकल्पना आजही तंतोतंत लागू पडते. अखंड समाजाचा विचार करणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या चिंतनावर विचार करण्याची देशाला गरज आहे. सध्या देशात सुरू असलेल्या मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, ग्रामीण कौशल्य योजना, मुद्रा बॅंक योजना आदी कल्याणकारी योजनांमागे मोदी सरकारचा नेमका सिद्धांत अंत्योदय, असाच आहे. 

 
सम्राट चंद्रगुप्त, जगतगुरू शंकराचार्य, अखंड भारत क्यों हैं, राष्ट्र जीवन की समस्याएं, राष्ट्र चिंतन, राष्ट्र जीवन की दिशा, आदी पुस्तक ग्रंथ प्रसिद्ध प्रकाशित झाले. 'एकात्म मानववाद' ही विचारधारा रुजवण्यावर भर दिला. जनसंघाच्या आर्थिक नीतींचे रचनाकार, मोदी सरकारच्या लोकप्रिय योजनांवर उपाध्याय यांच्या शैलीची छाप असते. मानव कल्याण विचारधारा बिंबवण्यावर भर आहे. एक महान चिंतक म्हणून ओळख झाली. त्यांचा मृत्यूही रहस्यमय होता ११ फेब्रुवारी १९६८ रोजी रहस्यमयरीत्या त्यांनी जगाचा निरोप घेतला. मुगलसराय रेल्वे यार्डमध्ये मिळाले त्यांचे शव आढळून आले होते. मात्र, समाजासाठी कायम अमर राहिले त्यांचे विचार आजही समाज मनावर कायम राहिले आहेत..‌. अशा प्रतिभावंत व्यक्तीमत्वाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. प्रस्तुत व्हीडिओत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला आहे. तो पाहून आपणहून देशप्रेम उफाळून येते.


@@AUTHORINFO_V1@@