दिपीका, श्रद्धा, रकूल आणि सारा भोवती चौकशीचा फेरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Sep-2020
Total Views |
Dipika_1  H x W


मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर आता ड्रग्ज अँगलमध्ये बॉलीवुड अभिनेत्री दिपीका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकूल प्रित सिंह यांची नावे उघड झाली आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोतर्फे (एनसीबी) बुधवारी समन्स बजावण्यात आले आहेत. तर एनसबी सुत्रांच्या मते, दिपीकाला २५ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. रकुल प्रीत सिंहला २४ सप्टेंबर, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान या दोघींना २६ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
 
 
 
दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यात शुक्रवार दि. २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या व्हॉटसअॅप चॅट संदर्भात मोठे गौप्यस्फोट झाले आहेत. २८ ऑक्टोबर २०१७ रोजी व्हॉट्सअॅपवर झालेल्या चर्चेत दिपीकाने ‘hash’ आणि ‘weed’, अशा शब्दांचा सामावेश केली आहे. प्रतिबंधित ड्रग्ज असलेल्या हशीश या ड्रग्जला hash असे संबोधले जाते. रियाने श्रद्धा, सारा, रकुल आणि फॅशन डिझायनर सिमोन खम्बाटासह २५ अभिनेत्रींसह अन्य काही जणांची नावे घेतली आहेत.
 
 
 
ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीत बुधवारचा दिवस ठरला होता. त्यानंतर आजची सुनावणी टळली. मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याने कोर्टाची कार्यवाही आज टळली होती. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी गुरुवारी सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.
 
 
१६ दिवस तुरुंगात असलेल्या रियाच्या जामीन अर्ज विशेष न्यायालयाने दोनदा फेटाळून लावला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज प्रकरणी तपास करत असलेल्या एनसीबीने आठ सप्टेंबर रोजी रियाला ताब्यात घेतले होते. तेव्हापासून रिया भायखळा तुरुंगात आहे. रियाची न्यायालयीन कोठडी ६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे.
 
 
सुशांतसाठी ड्रग्ज पुरवावेत यासाठी ती ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात होती, असा तिच्यावर आरोप आहे. भायखळा तुरुंगातून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रिया न्यायालयापुढे हजर झाली होती. त्यावेळी विशेष न्यायालयाने तिचा कोठडीतील मुक्काम ६ सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. रियाने आता उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तिचा भाऊ शौविकनेही जामीनासाठी अर्ज केला आहे.
 
 
ड्रग्ज प्रकरणात एकूण २० जण अटकेत
 
रिया आणि शौविकसह सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, हेल्पर दीपेश सावंत यांच्यासह अन्य ड्रग्ज पेडलर अशा एकूण २० जणांना एनसीबीने अटक केली आहे. मिरांडा, सावंत आणि ड्रग्स पेडलर अब्दुल बासित परिहार यांचा जामीन विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यांनीही मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागितली आहे. दरम्यान, यावर २९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@