500 रुपयांत कोरोना चाचणी : फेलूदा टेस्ट म्हणजे नक्की काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Sep-2020
Total Views |
Corona_1  H x W
 
 

नवी दिल्ली : भारतात ड्रग रेग्युलेटर असलेल्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियातर्फे ३० मिनिटांत कोरोनाचा योग्य अहवाल देणाऱ्या तंत्राला मंजूरी दिली आहे. पेपर बेस्ड टेस्ट स्ट्रीप, असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) आणि टाटा ग्रुप रिसर्च पथकाने ही टेस्ट विकसित केली आहे. या पथकाचे नेतृत्व डॉ. देवज्योति चक्रवर्ती आणि सौविक मैत्री यांनी किले आहे. या टेस्टचे नाव सत्यजित रे यांच्या काल्पनिक चरीत्र असलेल्या फेलूदाच्या नावे ठेवले आहे.
 
 
फेलुदा कोविड-१९ टेस्ट आहे तरी काय
 
फेलुदा FNCAS9 Editor Linked Uniform Detection Assay याचे लघू नाम आहे. स्वदेशी सीआरआयएसपीआय जीन-एडिटिंग तंत्रज्ञानावर आधारित हे तंत्रज्ञान आहे. कोरोना विषाणूच्या जनुकीय सामग्रीला ओळखून ही चाचणी केली जाते. इतर कोरोना चाचणीप्रमाणेच ही चाचणी विश्वासार्ह आहे, असा दावा करण्यात आला आहे. जगभरात केल्या जाणाऱ्या आरटी-पीसीआर टेस्टला कोरोना चाचणीला गोल्ड स्टॅण्डर्ड मानांकन आहे. कोरोना रुग्ण ओळखण्याचे तंत्रज्ञान असणाऱ्या या फेलूदा चाचणीचा निकाल लवकर येतो तसेच त्यासाठी लागणारे साहित्यही स्वस्त आहे.
 
 
सीएसआयआरच्या मते, कोरोना विषाणू ओळखण्याची तंत्राची संवेदनशीलता प्रमाण ९६ टक्के तर निदान चाचणीची अचूकता ९८ टक्के आहे. फेलुदा चाचणी जगातील पहिली असी चाचणी आहे जी कोरोना विषाणू ओळखण्यासाठी Cas9 प्रोटीनाचा वापर करते.
 
 
CRISPR तंत्र म्हणजे काय ?
 
 
सीआरआयएसपीआर (CRISPR) म्हणजे क्लस्टर्ड रेगुलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिंड्रॉमिक रिपीट्स जीन एडिटिंग तंत्रज्ञान आहे. त्याद्वारे जनुकीय डिफेक्ट्स दूर केले जाते. कुठल्याही प्रकारचा रोग पसरण्यापासून रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. हे डीएनए सिक्वेंस आणि जिन फंक्शन बदलतात. भविष्यातही कुठल्याही प्रकारच्या आजाराची माहिती देऊ शकतात. अमेरिकेने आपत्कालीन परिस्थिीतीत कोरोना टेस्टसाठी CRISPR-बेस्ड टेस्टला मंजूरी दिली होती. मॅसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि हार्वर्ड विद्यापीठाने या संदर्भात संशोधन केले होते.


 
 
फेलुदा कोविड-19 टेस्ट कशी काम करते.
 
फेलुदा टेस्ट ही गर्भनिदान चाचणी प्रमाणेच असते. विषाणू असल्यास स्ट्रीपचा रंग आपोआप बदलतो. पॅथलॅबमध्ये याचे परिक्षण केले जाऊ शकते. डॉ. देवज्योति चक्रवर्ती यांच्या मते, Cas9 प्रोटीनला बारकोड करण्यात आले आहे. ज्याद्वारे रुग्णाला कोरोना विषाणूच्या क्रमाची माहिती मिळू शकते. त्यानंतर Cas9-SARS-CoV2 कॉम्प्लेक्सला पेपर स्ट्रिपवर ठेवले जाते.
 
 
फेलूदा टेस्टची किंमत काय ?
 
फेलुदा टेस्ट करण्यासाठी केवळ पाचशे रुपये खर्च येतो. आरटी-पीसीआर टेस्ट करण्यासाठी १६०० ते २००० रुपये खर्च येतो. अँटीबॉडी टेस्ट केल्यानंतर २०-३० मिनिटांपर्यंत निकाल येतो. तर त्याचाही खर्च पाचशे ते सहाशे रुपये इतका आहे. रैपिड एंटीजन टेस्ट किटद्वारे ३० मिनिटांत अहवाल येते. त्याचा खर्च ४५० रुपयांपर्यंत आहे. ट्रूनेट टेस्टचा निकाल ६० मिनिटात येतो. त्याचे किट १३०० रुपये आहे.
@@AUTHORINFO_V1@@