माझे कुटुंब माझी जबाबदारी-१

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2020   
Total Views |

cmo_1  H x W: 0


एक बाप कसा असावा? एक पती कसा असावा? असे जर कुणी विचारले तर त्यांचेच नाव घ्यावे. नाहीतर गृहस्वामिनीला घर आणि वर्तमानपत्राचेही प्रमुख बनवणे कोण्या येरागबाळ्याचे काम नव्हे. येथे पाहिजे तेवढे कुटुंबवत्सल. पुढे जर कुणा गल्लीतल्या पोरालाही विचारले की, “सांग बाळा तुला बाप कसा हवा?” तर तोही यांचेच नाव घेईल. बाप म्हणून त्यांनी मुलाची घेतलेली काळजी, त्याच्या भविष्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचा नि:स्वार्थीपणा कोण दाखवू शकेल? छे, तुमच्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा बाप, त्याचा कितीही लाडाकोडाचा मुलगा असेल तर त्याला प्रॉव्हिडंट फंडातून घर आणि जास्तीत जास्त दुचाकी घेऊन देईल बस.



शूऽऽ अजिबात उलटसुलट बोललात. त्यांच्यासारखा कुटुंबप्रमुख लाभला आहे. कोण कुटुंबप्रमुख काय विचारता? असा स्पष्टवक्ता, निर्भय, ज्ञानी कुटुंबप्रमुख लाभला होता का कधी? आरोग्याचे इतके अचूक निदान की, डब्ल्यूएचओने सल्ला विचारावा. इतका निर्भयपणा की, सगळे जग कोरोनाने चळाचळा कापत असताना यांनी कोरोनालाही आदेश दिले होते... तर असा महान कुटुंबप्रमुख लाभला, तरी तुम्ही नाराज? आजपर्यंत इतका स्पष्टवक्तेपणा कुणी दाखवला होता का? ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ असे तुम्हाला सांंगणारा. खरेतर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ असे म्हणण्याची पात्रता आजपर्यंत दिल्लीच्या गांधी कुटुंबाशिवाय कुणाकडे नव्हती. पण आज ती पात्रता यांच्याकडे आहे. यांनी तुम्हाला सांगितले ना की, माझे कुटूंबच माझी जबाबदारी आहे. आपण म्हणतो ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.’ खरेच या कुटुंबप्रमुखाला वंदन करावे तेवढे थोडे आहे. त्यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबादारी’ सांगताना अगोदर केले मग सांगितले असे केले लोकहो. आहात कुठे? त्यांनी कुटुंबाची उन्नती कशी केली याचा आदर्श ठेवला ना तुमच्यासमोर. एक बाप कसा असावा? एक पती कसा असावा? असे जर कुणी विचारले तर त्यांचेच नाव घ्यावे. नाहीतर गृहस्वामिनीला घर आणि वर्तमानपत्राचेही प्रमुख बनवणे कोण्या येरागबाळ्याचे काम नव्हे. येथे पाहिजे तेवढे कुटुंबवत्सल. पुढे जर कुणा गल्लीतल्या पोरालाही विचारले की, “सांग बाळा तुला बाप कसा हवा?” तर तोही यांचेच नाव घेईल. बाप म्हणून त्यांनी मुलाची घेतलेली काळजी, त्याच्या भविष्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचा नि:स्वार्थीपणा कोण दाखवू शकेल? छे, तुमच्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा बाप, त्याचा कितीही लाडाकोडाचा मुलगा असेल तर त्याला प्रॉव्हिडंट फंडातून घर आणि जास्तीत जास्त दुचाकी घेऊन देईल बस. पण साहेबांंनी त्यांच्या मुलासाठी काय केले, काय करत आहेत हे कुणी सामान्य बाप करेल का? थोडक्यात, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ त्यांनी यथार्थ सांभाळली आहे. त्यामुळेच तर ते तुम्हालापण सांगतात की, आता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ स्वीकारा. उठा उठा कामाला लागा. आपल्या कुटुंबाची प्रगती करा. पण त्यांच्या आवाहनावर एकच म्हणायचे आहे की, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणताना ‘माझा समाज आणि देशही’ लक्षात ठेवा हो, आता याबाबत साहेबांंचे काय मत असावे बरं?


माझे कुटुंब माझी जबाबदारी-२


एसटी कर्मचार्‍यांचे पगार तीन महिने मिळाले नाहीत. याला पगार नाही, त्याचे काम सुरू नाही, इथे भ्रष्टाचार झाला, तिथे पैसे खाल्ले, इथे कोरोना वाढला, तिथे लोकं मेली, हे मला सांगू नका. मी चारचौघात अगदी कायदेशीररीत्या जाहीर केले की, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे ध्यानात ठेवा. अजून किती उघड बोलावे? तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी. काय म्हणता मी पूर्वी म्हणालेलो की, तुम्ही खबरदारी घ्या मी जबाबदारी घेतो? म्हणालेलो पण आता मी सांगतो ना की, आता प्रत्येकाचे कुटुंब प्रत्येकाची जबाबदारी. स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी स्वत: घ्या. किती सोप्पं आहे सगळं! गरम पाणी प्यायचे, काढा प्यायचा, पौष्टिक अन्न खायचे, नियमित आरोग्य तपासणी करायची. कामधंदे नंतर करता येतील. काही महिने घराच्या बाहेर पडायचे नाही. तुम्हाला हे इतकेच करायचे आहे. इतके पण तुम्ही करू शकत नाही. काय म्हणता की, “पाणी विकत घ्यायला पैसे नाही, गॅस सिलिंडर विकत घ्यायला पैसे नाहीत. पौष्टिक काय? साधी भाजी-भाकरी खाऊ शकत नाही. आरोग्य तपासणी कशी करणार? वस्तीतले दवाखाने केव्हाचे बंद पडलेत. आशा सेविका जीव मुठीत घेऊन येतात. पण आजारी पडल्यावर काय करणार त्या? तर नियमित तपासणी कशी आणि कुठे करणार? कामधंदे नंतर कशी करायची? कारण, कामधंदेच बंद पडले, तर कामाला कसे जाणार? किती काळ घरी बसायचे?”अरे हे कोणते जग? आम्ही तर कधी असे पाहिले नाही. आमचे भावोजी तर पैठणी खेळायला जातात, तर तिथे असे काही नसायचे. संजयच्या दूरदृष्टीनेही असे काही पाहिले नाही. काय म्हणता मग मी का आहे? का म्हणजे, मी तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करायला आहे.मी सगळ्या सरकारी योजनांना स्थगिती द्यायला तयार आहे. तशाही कशाला हव्यात योजना आणि उपक्रम! त्यात पैसा खर्च होतो. ते तसे होऊ नये म्हणून मी त्यांना स्थगितीच देऊन टाकतो. ‘ना होगी योजना होगा खर्चा.’ स्थगिती हे माझे ब्रॅण्ड आहे. ते मी आणि मीच वापरणार. काय वाटेल ते होवो, मी शक्य तिथे शक्य त्या वेळी स्थगिती देतोच. त्याचा फायदाच होतो ना? कुणाला म्हणजे मला. मला फायदा होतो. उगीच काम सुरू ठेऊन तो व्याप कुणी सांभाळायचा. इथे आधीच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आहे समजलं...
@@AUTHORINFO_V1@@