'बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे' ; चिमुरड्याची देवाकडे प्रार्थना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2020
Total Views |

bachhu kadu_1  



मुंबई :
महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री आणि अमरावतीतील आमदार बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बच्चू कडू यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या एका लहानग्याचा ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.




“देवा, बच्चू कडू भाऊले बरोबर निगेटिव्ह आणू दे, काहीच नको होऊ देऊ” असे हा चिमुरडा रडत देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहे. खुद्द बच्चू कडू यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे. “बेटा मला काहीच नाही होणार, औषधीसोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही. तू रडलास, तर मला बरं वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो. खूप मोठा हो, सेवा कर” अशा शब्दात कडूंनी लेकराला धीर दिला. ‘आपला भिडू बच्चू कडू’ असा नारा देणाऱ्या बच्चू कडू यांच्या समर्थकांना ‘भाऊ’ जवळचे वाटत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते.‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती शनिवारी ट्विटरवरुन दिली होती. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी.” असे आवाहन त्यांनी केले होते.
@@AUTHORINFO_V1@@