दहशतवाद्यांची पहाटे सीमेत घुसखोरी : जवानांनी लावली उधळून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2020
Total Views |
army_1  H x W:
 


श्रीनगर : कोरोना महामारीच्या काळातही पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी रविवारी पहाटे भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला.
 
रविवारी पहाटे सीमेपलीकडून काही अतिरेकी अंमलीपदार्थांसह आणि मोठ्या शस्त्रांत्रांसह भारतात घुसखोरीच्या तयारीत होते. मात्र बीएसएफच्या जवानांनी वेळीच गोळीबार करत घुसखोरीचा हा डाव उधळून लावला. या कारवाईत अंमलीपदार्थांच्या साठ्याबरोबरच मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.
 
बीएसएफच्या जवानांनी या कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरवत, अंमली पदार्थांचे ५८ पॅकेट्स दोन पिस्तुले, चार मॅगझिन आणि स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. याबाबत बीएसएफकडून सांगण्यात आले की, संशयित तस्करांनी शनिवार आणि रविवारी रात्री आरएसपुरा सेक्टरच्या अरनिया भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, जो बीएसएफच्या जवानांनी अयशस्वी ठरवला.
 
भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. शिवाय, यासाठी दहशतवाद्यांना देखील पाठबळ दिले जात आहे. मात्र, पाकिस्तानचे हे प्रयत्न प्रत्येक वेळी अयशस्वी ठरवण्यात भारतीय जवानांना यश येत आहे. शिवाय, घुसखोरीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी व घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आता भारताकडून ‘एलओसी’वर अतिरिक्त तीन हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@