दिलासादायक : भारतात सर्वाधिक 'कोरोनामुक्त'!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2020
Total Views |

Corona_1  H x W


कोरोनामुक्तांच्या आकडेवारीत भारत प्रथम स्थानी; सुमारे ८०% रुग्ण कोरोनामुक्त!


नवी दिल्ली : सध्या जगात कोरोना हा जीवघेणा आजार ठरला आहे. भारतातही रोज लाखाच्या जवळपास रुग्ण आढळत आहेत. मात्र यात एक मोठी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जगात भारतात सर्वात जास्त म्हणजे ७९.२८ टक्के आहे.


गेल्या २४ तासात ९५,८८० रुग्ण बरे झाले असून, १६ सप्टेंबरपासून भारतात दररोज ८० हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत एकूण ४२ लाखांच्या पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांच्या मृत्यूचीही टक्केवारीची कमी झाली आहे. सध्या ही टक्केवारी फक्त १.६१ आहे.


गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे ९३,३३७ रुग्ण आढळले आहात. १,२४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ५३,०८,०१५ झाली असून त्यातील १०,१३,९६४ ऍक्टिव्ह श्रेणीतील आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.


कोरोनाची साथ भारतात २०२१ मध्ये नियंत्रणात येईल, असा अंदाज भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच व्यक्त केला आहे. २०२१ च्या मध्यापर्यंत कोरोनाचे संकट कमी होईल, स्थिती सामान्य होईल, अशी शक्यता एम्सच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी व्यक्त केली आहे.


देशातील ५ राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असला तरी रिकव्हर होणाऱ्यांची संख्याही चांगली आहे.. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांत आतापर्यंत ६०% रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कोविड-१९वर लस किंवा औषध उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार आणि आरोग्य यंत्रणांकडून घालून देण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांवर आहे.



@@AUTHORINFO_V1@@