नापास विद्यार्थ्यांची परीक्षा तातडीने एका महिन्यात : उदय सामंत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2020
Total Views |
Uday samant_1  


पदवी प्रमाणपत्रावर कोविडचा शेरा असणार नाही!



मुंबई : कोरोनामुळे रखडलेल्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचे निकाल येत्या १० ऑक्टोबरपासून लागण्यास सुरुवात होणार आहे. या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर कोविड शेरा देण्यात येणार नाही. तसेच या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात घेतली जाणार असल्याचे, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.


अंतिम वर्षातील १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ ९० ते ९२ टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देतील अशी नोंद विद्यापीठाकडे झाली आहे. तर उरलेले १० टक्के विद्यार्थी हे स्वत: जवळच्या केंद्रात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.


या पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोविडचा कोणत्याही प्रकारचा शेरा दिला जाणार नाही. हे पदवीचे प्रमाणपत्र हे गेल्यावर्षीप्रमाणेच दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनात कोणाताही संभ्रम ठेवू नये. या प्रमाणपत्राचा आदर हा सर्व ठिकाणी पूर्वीप्रमाणे केला पाहिजे. या पदवीकडे जर कोणी बघत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी,” असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@