‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ला आशा सेविकांची नापसंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2020
Total Views |

Aasha_1  H x W:
मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावपातळीवरील लोकप्रतिनिधींपासून सामान्य लोकांसह सर्वांचा सहभाग असलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही योजना सुरु करण्याची घोषणा केली. मात्र आता ही योजना अडचणीत सापडली असून लाखो अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांनी या योजनेवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी होणे कठीण झाले आहे.
 
 
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेत गावातील ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्यांपासून नगरसेवक व आमदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होणे अपेक्षित आहे. राज्यातील घराघरात जाऊन कोणी आजारी आहे का, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे वा अन्य आजाराचे रुग्ण शोधणे, वृद्ध लोकांची माहिती गोळा करणे तसेच ताप व खोकला असल्यास करोना चाचणी व उपचार करून घेणे आदी कामे या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. या मोहिमेचे सारे यश हे दोन लाख अंगणवाडी सेविका व सुमारे ७० हजार आशा कार्यकर्त्यांच्या सहभागावर अवलंबून असून आशा व अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव यांच्या योजनेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य आशा कार्यकर्ती संघटना व राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दोन स्वतंत्र पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवली आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@