केमिकल स्फोटाने वरळी हादरली ; एक महिला किरकोळ जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2020
Total Views |

worli explosion_1 &n


मुंबई :
वरळीतील सेंच्युरी बाजार येथील मनिष कर्मिशिअल सेंटरमध्ये शुक्रवारी सकाळी ८.५० च्या सुमारास २५० लिटर नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुचित कौर ही महिला जखमी झाली असून, त्यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला आहे.



worli_1  H x W:

हा स्फोट एवढा भयंकर होता की स्फोटातून बाहेर पडलेले अवशेष समोरच्या इमारतीवर जाऊन आदळले. या इमारतीला देखील याचा फटका बसला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी मदत कार्य हाती घेतले होते. शिवाय या घटनेमुळे येथील वाहतूकदेखील काही काळ विस्कळीत झाली होती. दुर्घटनेनंतर येथील परिस्थिती पूर्ववत करण्याचे काम सुरु होते. जुन्या पासपोर्ट ऑफिस इमारतीच्या वरच्या मजल्यावरील केमिकल लॅबमध्ये हा भीषण स्फोट झाला. सुदैवानं यात मोठी जिवीत हानी झाली नाही, केवळ एक महिला किरकोळ जखमी झाली.
@@AUTHORINFO_V1@@