लालपरी सुसाट...एसटी आजपासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2020
Total Views |

ST buses_1  H x


मुंबई :
महाराष्ट्राची लाडकी लालपरी म्हणजेच एसटी आता पूर्ण आसन क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करणार आहे. मात्र एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणे बंधनकारक आहे. २० आॅगस्टपासून सामाजिक अंतर राखत आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रमाणे आंतर जिल्हा वाहतूक सुरू करण्यास राज्य परिवहन मंडळास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली.



कर्नाटक आणि गुजरात राज्यात १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्याच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने करण्यास मंजुरी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाºया बस निर्जंतुक करूनच मार्गस्थ करण्यात येतील. लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बससाठी एका आसनावर एक प्रवासी अशा तिरप्या पद्धतीने आरक्षण उपलब्ध असेल. सध्या दिवसभरात पाच हजार बस धावतात. तर सरासरी ५ ते ६ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. पूर्ण आसन क्षमतेने वाहतूक सुरू झाल्यास, प्रवाशांना दिलासा मिळेल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळे बंदीच्या काळात गेली पाच महिने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यभर एसटी वाहतूक बंद होती. नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार, टप्प्याटप्प्याने ती सुरू करण्यात आली. एसटीच्या सर्व बसेस वारंवार निर्जंतुक करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसचा प्राधान्याने विचार करावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@