एनसीबी कारवाई : ड्रग्सप्रकरणी मुंबईतून ५ जणांना अटक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2020
Total Views |
Drugs_1  H x W:



एक किलो ड्रग्स तर चार लाखांची रोकड जप्त!


मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात कारवाई सुरू आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गुरुवारी मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली जात आहे. या छाप्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आली आहे. या पाच जणांच्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक नामवंतांची नावे समोर येऊ शकतात. यापूर्वी रिया चक्रवर्तीनेही अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावेही उघड केली आहेत. परंतु, एनसीबीने त्यापैकी कोणालाही समन्स बजावले नाही.


एनसीबी मुंबईने हिमाचल प्रदेशातून एक किलो चरससोबत ड्रग्स पेडलर राहिल विश्रामला ताब्यात घेतले आहे. एनसीबीने त्याच्याकडून ४.५ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील संबंधीत इतर पेडलर्ससोबत त्याचा संबंध आहे. राहिल विश्रामचे सुशांत सिंह मृत्यू प्रकरणासंबंधीत ड्रग्स तस्करांशी थेट संबंध असल्याचे बोलले जात आहे. राहिलचे अनुज केसवानी, कैझान आणि शोविक चक्रवर्ती यांच्याशी थेट असल्याचे समोर आले आहे.


मुंबई येथून अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर सूर्यदीप मल्होत्राला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुशांत सिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीने मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्याशी संबंध ठेवल्याबद्दल सूर्यदीपला अटक केली होती. असे म्हटले जाते की महाविद्यालयीन काळापासून सूर्यदीप शौविकचा चांगला मित्र होता. सूर्यदीप मल्होत्रा ​​मुंबईतील सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवत असत.
@@AUTHORINFO_V1@@