मराठा समजाच्या आरक्षणासाठी मी पदाचा राजीनामा देईन !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2020
Total Views |
Udayanraje Bhoasle_1 
 
 
 
 
मुंबई : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाज आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याची वेळ आली तर कोणत्याही परिस्थितीत मी राजीनामा देणारच. मग फक्त मराठा नाही तर ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्या सर्वांसाठी मी राजीनामा देणार. जर काही होत नसेल तर पदावरुन राहून काय उपयोग?,” असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
 
 
“इतर समाजाचा आदर आहेच पण, मराठी समाजाला आरक्षण देण्यासाठी माझी राजकारण सोडण्याचीदेखील तयारी आहे. माझी बांधिलकी लोकांशी आहे, पक्षाशी नाही. कोणताही पक्ष हा लोकांच्या जीवावर असतो. जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी कधीच करत नाही, मग ते काहीही असो. प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे. न्याय नाही मिळाला तर उद्रेक होणारच. पण जर तो झाला तर मग त्याला जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@