मुंबईत कलम १४४ लागू : ३० सप्टेंबरपर्यंत जमावबंदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2020
Total Views |

Mumbai_1  H x W




मुंबई
: कोरोना नियंत्रण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने मुंबईत आता पुन्हा एकदा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू असेल. चार पेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरता येणार नाही. जर नियम मोडताना आढळल्यास मुंबई पोलीस कठोर कारवाई करणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वाढतच चालला आहे.



अनेक जण मास्कचा वापर न फिरता सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. त्यामुळे यापुढे बेजबाबदारपणे फिरताना आढळलेल्या समुहावर कारवाई केली जाणार आहे. मुंबई पोलीसांच्या नित्यक्रमाचा हा भाग असून अनलॉक मार्गदर्शक नियमावली किंवा पुन्हा एकदा लॉकडाऊन, असा या प्रक्रीयेचा अर्थ नाही, असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच सवलत देण्यात आलेल्या गोष्टी सुरूच राहतील, त्यात कुठलेही बदल होणार नाहीत. असेही सांगण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@