ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने रकुलप्रीत सिंगची कोर्टात धाव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2020
Total Views |

Rakul preet_1  



‘मीडिया ट्रायल’ थांबवण्याची केली मागणी!


दिल्ली : रिया चक्रवर्तीने ड्रग्ज अँगलच्या चौकशीदरम्यान अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिचे नाव घेतले आहे. ड्रग्ज प्रकरणात मीडियामध्ये नाव समोर आल्यानंतर रकुल प्रीत सिंहने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रकुलने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रकुलने याचिकेत आपल्याविरोधात सुरु असलेले ‘मीडिया ट्रायल’ थांबवले जावेत अशी मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. तसेच मीडियामध्ये दाखवण्यात आलेल्या गोष्टींमुळे प्रतिमा मलीन होत असल्याचाही उल्लेख केला आहे.


सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी)ने रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवनासह अन्य आरोपांखाली अटक केली असून सध्या ती भायखळा तुरुंगात आहे. या प्रकरणी सुरु असलेल्या चौकशीमध्ये रियाने २५ बड्या कलाकारांची नावे घेतली होती. यात रकुलप्रीतसह सारा अली खान, फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांच्या नावांचा समावेश असल्याचे म्हटले गेले आहे. त्यानंतर रकुलने दिल्ली हायकोर्टात या विरुद्ध याचिका दाखल केली आहे.


दरम्यान, सुशांत प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय टीम दिल्ली येथे पोहोचली असून गुरुवारी ते एम्सच्या डॉक्टरांना भेटू शकतात. पुढील आठवड्यात एम्सची टीम आपला अंतिम अहवाल सीबीआयकडे सोपवण्याची शक्यता आहे.




@@AUTHORINFO_V1@@