"लज्जास्पद कंगना!" डॉ. माधुरी कानिटकर कंगनावर भडकल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2020
Total Views |

kangana_1  H x



मुंबई :
महाराष्ट्रातील पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी कंगना रनौत-उर्मिला मातोंडकर वादावर भाष्य केले आहे.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ‘सॉफ्ट पॉर्न’साठी परिचित असल्याची बोचरी टीका कंगना रनौत हिने केली होती. यावर डॉ. कानिटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत उर्मिला यांचा अभिमान वाटल्याची भावना डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केली आहे.


“लज्जास्पद आहे कंगना रनौत. मी सहसा कुणावर कधीच भाष्य करत नाही. पण एक स्त्री म्हणून हे मला खूप वेदना देणारं आहे” असे लिहित “आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे उर्मिला मातोंडकरजी” असे डॉ. माधुरी कानिटकर यांनी ट्विटरवर कंगनाचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे.



दरम्यान, कंगनाने टाइम्सला मुलखात देताना वक्तव्य केले की, “मी आज उर्मिला मातोंडकर यांची एक मुलाखत पाहिली. त्या संपूर्ण मुलाखतीत माझी खिल्ली उडवत होत्या. माझ्या संघर्षावरुन मला चिडवत होत्या. मी तिकीट मिळवण्यासाठी भाजपला खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्या म्हणाल्या. पण मला तिकीट मिळवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याशी खेळ करण्याची गरज नाही, हे सांगण्यासाठी कोणी हुशार असायची गरज नाही. उर्मिला मातोंडकर… ती एक सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परिचित नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला (तिकीट) का नाही मिळणार?” यावरूनच डॉ माधुरी कानिटकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
@@AUTHORINFO_V1@@