मुंबई महापौरांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सोमय्या यांची आयुक्तांकडे तक्रार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2020
Total Views |
kirit somaiya_1 &nbs


सखोल चौकशीची केली मागणी


मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्याकडे केली आहे. सोमय्या यांनी आज यासंदर्भात तक्रार अर्जच दाखल केला. आज भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली. महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात खालील बाबींविरोधात तक्रार दाखल केली.


गरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेली एसआरएची जागा बळकावून तेथे मुलाची नियमबाह्य कंपनी स्थापन करणे, एकाच पत्त्यावर अनेक बोगस कंपन्या स्थापन करून शासनाची फसवणूक करणे आणि पदाचा गैरवापर करून नातेवाईकांना महापालिकेची कंत्राटे मिळवून देणे, असे मुख्य आरोप या तक्रार अर्जात आहेत.


सोमय्या यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की,


१) भ्रष्ट कारभार, खोटी आणि चुकीची विधाने करत महापौर जनतेची दिशाभूल करत आहेत.

२) अवैध आणि भ्रष्ट कारभारात हस्तक्षेप असून, गरीब झोपडपट्टीवासीयांसाठी राखीव असलेल्या झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाची जागा जागा अवैधरित्या बळकावली आहे.

३) महापौरपदाचा गैरवापर करत महापालिका, झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण आणि सरकारी प्राधिकरणांकडून कंत्राट मिळवत आर्थिक लाभ पदरात पाडून घेतले आहेत.

४) महापौरपदाचा स्वत:साठी आणि कुटुंबियांसाठी गैरवापर करुन घेण्यात आला आहे.

५) सरकारी आणि रजिस्टर कंपनी कार्यालयांकडे चुकीची माहिती सादर करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

६) निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आणि रजिस्टर कंपनी कार्यालयाकडे चुकीची माहिती जमा केली. तसेच आवश्यक कागदपत्रे जमा केली नाहीत.

७) डॉ. किरीट सोमैया यांनी किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधातील कागदपत्रेही जमा केली आहेत.

अ) गोमती जनता एसआरए सोसायटी/ प्रकल्पातील झोपडपट्टीवासीयांसाठी असलेली राखीव जागा बळकावली.

ब) किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे रजिस्टर असून, ही कंपनी तळमजला, बिल्डिंग क्रमांक १ गोमती जनता एसआरए सोसायटी या पत्त्यावर रजिस्टर आहे. ही जागा कुटुंबीयांच्या मालकीची नसून ते सोसायटीचे वेलफेअर ऑफिस आहे.

८) या एसआरए सोसायटीतील सुरुवातीपासून म्हणजेच सुमारे १२ वर्षापासून एक फ्लॅटही बळकावला आहे.

९) याबाबत त्यांनी जाहीर स्टेटमेंट प्रसिध्द केले आहे की, सदर दोन्ही जागांसाठी मालकाला भादे देत आहे आणि त्याचा करारनामा आहे.
 
 
१०) एसआरए कायद्यांतर्गत हे गैर आहे. हे कायदेशीर नाही.
 
 
११) अशा प्रकारची कागदपत्रे आणि करारनामा त्यांनी कोणत्याही सरकारी कार्यालयाकडे जमा केलेला नाही.
 
 
१२) मुंबई महापालिका आणि एसआरए प्राधिकरणाला अशा प्रकारे उल्लंघन केलेल्याची माहिती असतानाही त्यांनी महापौर किंवा त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणतीच कारवाई केलेली नाही.
 
 
१३) किश कॉर्पोरेटस् सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची रजिस्टर ऑफ कंपनीजकडे नोंदवलेली कागदपत्रे अपूर्ण आहेत.
 
 
१४) महापौर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कंपनीला मुंबई महापालिकेचे कंत्राट मिळतात हे या आधाही सिध्द झाले आहे.
 
 
 
किरीट सोमैया यांनी महापौरांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात चौकशी आणि कारवाईची मागणी केली असून त्यांचे पद धोक्यात येण्याची शक्यता आहे.






@@AUTHORINFO_V1@@