'हा तर माझ्या स्वप्नांचा बलात्कार ; एका मंदिराचे कब्रस्तान केले'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2020
Total Views |

kangana ranaut_1 &nb



मुंबई :
मुंबई महानगपालिकेच्या कारवाईनंतर ८ दिवसांनी अभिनेत्री कंगना रानौतने ट्विटरवर तिच्या ऑफिसची छायाचित्रे शेअर केली. यामध्ये तिने तीन ट्विट करत, 'हा बलात्कार आहे, माझ्या स्वप्नांचा, स्वप्ने, माझ्या आत्मविश्वासाचा, माझ्यातील स्वाभिमानाचा आणि माझ्या भविष्याचा'. मुंबई महानगरपालिकेने संजय राऊत आणि कंगना रानौत यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर ९ सप्टेंबर रोजी कंगनाच्या पाली हिल कार्यालयात कारवाई केली होती. तिच्या कार्यालयातील बांधकाम अनधिकृत असल्याचे ठरवीत त्यावर बुलडोझर चालविला. पालिकेच्या पथकाने सुमारे दोन तास जेसीबी मशीन, हातोडा आणि क्रेनच्या साहाय्याने तोडफोड केली. त्याच दिवशी कंगना हिमाचलहून मुंबईला पोहोचली. मात्र, बीएमसीच्या कारवाईवर कंगनाने उच्च न्यायालयातून स्थगिती आणली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी २२सप्टेंबर रोजी होईल.





कंगनाचे २ कोटींचे नुकसान

मुंबई महापालिकेच्या कारवाईमुळे कंगनाला २ कोटींचा तोटा झाल्याचे वृत्त आहे. कंगनाने हे तीन मजली कार्यालय तयार करण्यासाठी सुमारे ४८ कोटी रुपये खर्च केले. १० सप्टेंबरला ती म्हणाली, 'मी १५ जानेवारीला कार्यालयाचे उदघाटन केले. त्यानंतर कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भामुळे बर्‍याच लोकांप्रमाणे मी देखील कोणतेही काम केले नाही. हे काम पुन्हाकरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत.आता अशास्थितीतील कार्यालयातच मी काम करीन. हे कार्यालय प्रतीक असेल त्या महिलांचे चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवतात.'
@@AUTHORINFO_V1@@