श्रीनगर चकमक : ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2020
Total Views |

Batmaloo_1  H x
 
काश्मीर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये बाटमलू भागात गुरुवारी सकाळीपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिली आहे. परंतु, दुर्दैवाने यामध्ये १ एक स्थानिक महिलेच मृत्यू झाला असून २ जवान जखमी झाले आहेत.
 
 
सुरक्षा दलांना बाटमालू भागामध्ये दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी पहाटे २.३० वाज्यापासून सर्च ऑपरेशन सुरू केले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांमार्फत अजूनही शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देण्यात येत आहे. दुर्दैवाने या चकमकीदरम्यान गोळी लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कौंसर रियाझ असे या महिलेचे नाव आहे. तसेच, या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान गोळी लागून जखमी झाले आहेत. यांपैकी एक अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@