लडाखमध्ये बोफोर्स तोफा होणार तैनात?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |

bofors_1  H x W



नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये चीनचा घुसखोरीचा प्रयत्न सुरू असल्याने भारत-चीन तणाव शिगेला पोहोचला आहे. भारतीय सैन्याने आता बोफोर्स होवित्झर तोफा या ठिकाणी तैनात करण्याची तयारी सुरू केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृद्द दिले आहे. सेनाचे अभियंते बोफोर्स तोफांच्या सर्व्हीसिंगमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांतच तोफा सीमेवर तैनात केल्या जाणार आहेत.
 
 
पाकिस्तानचे केले होते नुकसान
 
 
बोफोर्स तोफा १९८० मध्ये सैन्यदलात सामील केल्या गेल्या. कमी आणि जास्त उंचीवरून हल्ला करण्यासाठी उपयुक्त अससेल्या या तोफा युद्धात महत्वाच्या ठरल्या आहेत. १९९९ मध्ये पाकिस्तान विरोधात कारगील युद्ध जिंकण्यात या तोफांची भूमीका महत्वाची होती. बऱ्याच उंचीवर असलेले पाकिस्तानी बंकर आणि चौक्या उद्धस्त करण्यात भारतीय सैन्याला यश आले होते. त्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते.
 
 
अधिकारी अभियंते सज्ज
 
चीनी सैन्याची घुसखोरी वाढत गेली तर भविष्यात सैन्याला या तोफांची सीमेवर गरज भासू शकते. याच पार्श्वभूमीवर तोफांची सर्विसिंग आणि देखभालीचे काम सुरू आहे. लेफ्ट. कर्नल प्रिती कंवर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्या म्हणतात, वर्कशॉपमध्ये सैन्याचे अभियंते या शस्त्रास्त्रांची देखभाल करतात. या शस्त्रास्त्रांची विशेष परिस्थितीत आवश्यकता भासत असते. टेक्निकल स्टोअर ग्रुप एक टँक फायरींचा पिन ते इंजिनापर्यंत गोष्टी उपलब्ध करत असते.
 
 
भारत-चीन सीमेवर २० दिवसांत तीनदा गोळीबार
 
 
लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणाव सुरू आहे. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांना भिडले यात भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आले. चीनचेही ४० हून अधिक सैनिक मारले गेले. मात्र, चीनने याची कबुली दिली नाही. २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने पँगॉन्ग सरोवराच्या दक्षिणेकडील एका टेकडीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. २० दिवसांत दोन्हीकडे तीनदा हवेत गोळीबार झाला आहे.
 
 
पहिला गोळीबार - २९-३१ ऑगस्ट रोजी पँगॉन्ग सरोवराच्या दक्षिणेकडील भागात
 
दूसरा गोळीबार - ७ सप्टेंबर रोजी मुखपारी हाइट्स या भागात
 
तिसरा गोळीबार: ८ सप्टेंबर रोजी पैंगॉन्ग सरोवराच्या उत्तरेकडील भागात
@@AUTHORINFO_V1@@