कोरोनाचे १० रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत ‘सील’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |
BLDG_1  H x W:



कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेची नवी नियमावली जारी!


मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इमारतीत किंवा टॉवरमध्ये १० पेक्षा अधिक रुग्ण आढळले तर ती इमारत सील करण्यात येणार आहे. तसेच सदर रुग्ण दोन किंवा अधिक मजल्यावर आढळले तरी ती इमारत सील करण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने ही नवीन नियमावली जाहीर केली आहे.


मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. परंतु आर्थिक कोंडी फोडण्यासाठी टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असून आता अनलॉक ४चा टप्पा सुरु आहे. अनलॉक जाहीर केल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष करुन टॉवर, उंच इमारतीत कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. तरीही सुरक्षेच्या कारणास्तव यापुढे एखाद्या इमारतीत अथवा टॉवरमध्ये १० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करण्यात येईल. तसाच दिन किंवा अधिक मजल्यावर रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. एखाद्या सदनिकेत एखादा रुग्ण आढळला तर ती सदनिका अथवा मजला सील करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.


दरम्यान, ज्या इमारतीत कोरोनाचे रुग्ण आढळून येतील त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेत इमारत सील करण्याबाबत योग्य तो निर्णय संबंधित सहायक आयुक्त किंवा संबंधित आरोग्य अधिकारी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ४० मजली टॉवर असेल त्या टॉवरमध्ये एखाद्या मजल्यावर १० पेक्षा अधिक रुग्ण आढळले तर तो टॉवर सील करायचा की नाही, याबाबत सहाय्यक आयुक्त किंवा आरोग्य अधिकारी योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. चाळ अथवा झोपडपट्टी ही कंटेमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येते. त्या ठिकाणच्या परिसराची पाहणी करत झोपडपट्टी अथवा चाळ सील करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही गोमारे यांनी सांगितले.



@@AUTHORINFO_V1@@