दिल्ली दंगल पूर्वनियोजितच : १० हजार पानी आरोपपत्र दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |

FIR_1  H x W: 0
 
 
नवी दिल्ली : दिल्ली पोलीसांच्या विशेष पथकाने बुधवारी दिल्ली हिंसाचार प्रकरणी १५ आरोपींविरोधात १० हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कड़कड़डूमा न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी व्हॉटसअॅप ग्रुप्स, चॅट आणि हिंसा पसरवण्याचा कट आखण्यात आल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. यासाठी पुराव्यादाखल २४ फेब्रुवारी रोजीचे चॅट दाखवण्यात आले आहेत. या दिवशीच दंगल भडकवण्यात आली होती.
 
 
 
आरोपपत्रानुसार, मुख्य आरोपी प्रदर्शनकर्त्यांना सूचना देत असल्याचे यात निष्पन्न होत आहेत. प्रत्येक ठिकाणी दंगल पसवरण्यासाठी २५ व्हॉटसअॅप ग्रुप बनवण्यात आले होते. पोलीसांनी या प्रत्येक ग्रुपबद्दल माहिती मिळवली आहे. आरोपपत्रात उमर खालीद आणि शरजील इमामचे नाव दाखल झालेले नाही. पोलीसांच्या मते नुकतीच कारवाई झाल्यामुळे पुरवणी आरोपपत्रात त्यांचे नाव दाखल केले जाणार आहे.
 
 
कोणाकोणाची नावे ?
 
आरोपपत्रात आम आदमी पक्षातून निलंबित नेता ताहीर हुसैन, देवांगना कलिता आणि नताशा नरवाल, पीएफआय नेता परवेज अहमद आणि मोहम्मद इलियाज, कार्यकर्ता सैफी खालीद, पूर्व पार्षद इशरत जहाँ, जामियाचा विद्यार्थी आसिफ इकबाल, मीरान हैदर आणि सफूरा जरगर, शादाब अहमद, तस्लीम अहमद आदींचा या आरोपपत्रात उल्लेख आहे. या सर्वांवर युएपीए कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
 
दिल्ली दंगलीत ५३ जणांचा मृत्यू
 
सीएए विरोधात केलेल्या प्रदर्शनात उत्तर पूर्व दिल्लीत २४ फेब्रुवारी रोजी दंगल उसळली होती. त्यात ५३ जणांचा मृत्यू झाला होता. दोनशेहून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणी पोलीसांनी ७५१ एफआयआर दाखल केले होते.
@@AUTHORINFO_V1@@