भाजप आमदार सुरेश धस यांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |
Suresh Dhas_1  
 
 

नगर : ऊसतोड कामगारांचे आंदोलन सुरू असताना मजूरांना भाजप आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांनी आष्टी येथे अडवले. या प्रकरणी पोलीसांनी धस यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. महाराष्ट्र ऊसतोड मजूरांचा संप सुरू आहे. मालेगाव, नाशिक या भागाातून ऊसतोड मजूरांना घेऊन जाणारे मिरजगाव (जि.नगर) हद्दीत म्हाडा तालुका, कर्जत तालुक्यात अंबालिका या कारखान्यांवर हे मजूर जात होते.
 
 
 
 
आष्टीहून नेणाऱ्या चारशे ते साडेचारशे मजूर आपल्या लहान मुलांसह जात होते. कोरोना टेस्ट नाही, सोशल डिस्टंसिंग नाही किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही काळजी घेतलेली नाही. हा प्रकार पाहत धस यांनी मजूरांना अडवले. कुठलाही कारखाना सुरू नसताना मजूर नेण्याची घाई कशाला, असा प्रश्न धस यांनी विचारला आहे. मुकादम आणि मजूरांच्या वाढीसाठी जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत संप सुरू असेल, या काळात राज्यात कुठल्याही प्रकारे कारखानदार वाहतूक करणार असतील तर संप आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा धस यांनी दिला आहे. दरम्यान, काही काळातनंतर धस यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. 
@@AUTHORINFO_V1@@