मराठमोळे बैजू पाटील सुप्रसिद्ध निकॉन कंपनीचे ब्रँड अँबेसिडर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2020
Total Views |

Baiju Patil_1  
 
औरंगाबाद : कॅमेरा उत्पादनात सुप्रसिद्ध असलेल्या ‘निकॉन’ कंपनीचे ब्रँड अँबेसिडर होण्याचा मान औरंगाबादच्या बैजू पाटील यांना मिळाला आहे. वन्य जीव छायाचित्रकार म्हणून असा बहुमान मिळवणारे बैजू पाटील देशातील पहिलेच छायाचित्रकार ठरले आहेत. हा सन्मान मिळाल्यानंतर मागील ३० वर्षांमध्ये केलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ‘निकॉन’ या कंपनीने तयार केलेल्या नवनवीन कॅमेऱ्यांचे ब्रँडिंग बैजू पाटील यांना करायला मिळणार आहे.
 
 
छायाचित्रकार म्हणून बैजू पाटील यांच्या कार्याची जागतिक स्तरावर अनेकदा दखल घेण्यात आली. त्यांच्या या कार्याला प्रभावित होऊन बैजू पाटील यांच्या माध्यमातून कॅमेरा हाताळणाऱ्या किंवा कॅमेऱ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या ज्ञानाचा आणि कलेचा फायदा होईल, यासाठी पुढील तीन वर्षांसाठी बैजू पाटील यांना हा सन्मान देण्यात आला आहे.
 
 
त्यांच्या प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती देणारा हा खास लेख ... 
 
 
 
बैजू पाटील यांनी यावेळी सांगितले की, “जुन्या काळामध्ये निगेटिव्हीद्वारे काढण्यात येणारे छायाचित्र ते आताच्या मिरर लेस प्रणाली पर्यंतचे जवळपास सर्वच कॅमेरे वापरण्याची मला संधी मिळाली. माझ्या कामाचे कौतुक झाले. याच कामाच्या माध्यमातून अनेकांनी प्रेरणा घेतली. मागील ३० वर्षांमध्ये माझ्या कामामध्ये नाविन्य असल्याने मला ही संधी देण्यात आली. यामुळे मला आता वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन काम करायला मिळेल. तिथे कॅमेराबद्दल मार्गदर्शन करण्याचा अनुभव मिळणार आहे. प्रत्येक भागात छायाचित्र घेताना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. त्यात आता नव्या कॅमेऱ्यामध्ये काय बदल हवा, याबाबत मला तांत्रिक सल्लाही द्यावा लागणार आहे. हे माझ्या आवडीचे असून मला याचा खूप आनंद झाला आहे.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@