बॉलिवूडची बदनामी करण्याचे षडयंत्र! : जया बच्चन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2020
Total Views |

Kangana_1  H x



कंगनाचे अभिषेक बच्चनला उद्देशून ट्विट; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भडकल्या जय बच्चन!


नवी दिल्ली : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेकांनी यावर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. पावसाळी अधिवेशाच्या पहिल्या दिवशी गोरखपूरचे खासदार आणि अभिनेत रवी किशन यांनी संसदेत देश आणि बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वाढता वापर आणि तस्करीचा मुद्दा मांडला होता. यावर आता खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जया बच्चन यांनी कोणाचंच नाव न घेता 'जो लोग जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है' असं म्हणत रवी किशन यांच्यावर हल्लाबोल केला आहे.


जया बच्चन संसदेत बोलताना म्हणाल्या की, 'चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य काल इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे अत्यंत लज्जास्पद आहे. मी कोणाचंही नाव घेत नाहीये. ते स्वतःही याच इंडस्ट्रीत काम करतात. जो लोग जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है. ही चुकीची गोष्ट आहे. मला आता सांगावं लागत आहे की, इंडस्ट्रीला सरकारच्या सुरक्षेची आणि समर्थनाची गरज आहे.'


सोमवारी भाजप खासदार रवी किशन यांनी लोकसभेत ड्रग्ज आणि बॉलिवूड कनेक्शनचा मुद्दा उपस्थित केला होता. ते शून्य तासाच्या दरम्यान म्हणाले की, पाकिस्तान आणि चीनमधून ड्रग्सची तस्करी केली जात आहे. देशातील तरुण पिढी उद्ध्वस्त करण्याचा हा कट आहे. ते म्हणाले की ते आपल्या चित्रपटसृष्टीत शिरले आहे आणि एनसीबी त्याचा तपास करीत आहे. ते म्हणाले की, माझी मागणी आहे की या संदर्भात कठोर कारवाई केली जावी.


दरम्यान अभिनेत्री कंगना राणावतने चित्रपट सृष्टीत महिला सुरक्षित नसल्याचा मुद्दा अधोरेखित करत एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने अभिषेक बच्चन याला टॅग केले आहे. त्यामुळे आता हा नवा वाद काय वळण घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
@@AUTHORINFO_V1@@