संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताला महिलांविषयक आयोगाचे सदस्यपद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2020
Total Views |
ECOSO_1  H x W:



नवी दिल्ली :
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेशी (Economic and Social Council – ECOSOC) निगडीत आयोगावर भारताने चीनला धोबीपछाड दिली. त्यामुळे एलएसी सीमारेषेवरील तणाव आणि दररोज नव्या क्लुप्त्या शोधात भारताबरोबर डाव खेळणाऱ्या चीनला संयुक्त राष्ट्रात आता मोठा झटका बसला आहे. महिलांच्या स्थितीवर काम करणाऱ्या आयोगाचा सदस्य म्हणून भारताची सोमवारी निवड झाली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी माहिती दिली.


भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी ट्विट करत माहिती दिली. त्यांनी लिहिले की, “भारताने प्रतिष्ठित प्रतिष्ठीत आर्थिक आणि सामाजिक परिषदमध्ये जागा मिळवली आहे. महिलांच्या स्थितीवर काम करणाऱ्या (Commission on Status of Women – CSW) आयोगाचा सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे. ही बाब लैंगिक समानता तसेच महिला सक्षमीकरणासाठी असलेली आमची वचनबद्धता आणि कार्यतत्परता दर्शवणारी आहे. याबद्दल आम्ही सर्व सदस्यांचे आभार मानतो” असे ट्वीट टीएस तिरुमूर्ती यांनी केले.



भारत, अफगाणिस्तान आणि चीन यांनी ही निवडणूक लढवली होती. भारत आणि अफगाणिस्तानने ५४ सदस्यांपैकी बहुतांश मते जिंकली, तर चीनला निम्म्या मतांचा टप्पाही ओलांडता आला नाही. पुढील चार वर्षे (२०२१ ते २०२५) भारत या आयोगाचा सदस्य राहणार आहे.याआधी, भारताला जून महिन्यातच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे (UNSC) अस्थायी सदस्यत्व बहाल करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांनी भारताला बहुमताने मंजुरी दिल्याने आशिया कालखंडातून भारत बिनविरोध निवडून आला होता. २०२१-२२ या कालावधीसाठी अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@