सुब्रमण्यम स्वामींच्या वाढदिवसानिमित्ताने संस्थेकडून राम मंदिरासाठी देणगी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2020
Total Views |
swami_1  H x W:



सुब्रमण्यम स्वामी यांच्या ‘विराट हिंदूस्थान संगम’संस्थेच्या महाराष्ट्र शाखेकडून राम मंदिर निर्माणासाठी १३,०९,२७५ /- रुपयांची देणगी!

मुंबई : राज्यसभेचे भाजप चे खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी आज १५ सप्टेंबर रोजी त्यांच्या ८१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्या निमित्ताने त्यांनी श्री रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासाला १३,०९,२७५ /- रुपयांची देणगी देऊ केली आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचे कार्य सुरु आहे. हे मंदिर संपूर्ण दगडी बनावटीचे असून दोन दगडांना जोडण्यासाठी तांब्याच्या धातूच्या पट्ट्या दान करण्याचे आवाहन श्री रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासाचे सचिव श्री चंपत राय यांनी लोकांना केलेले होते. ह्याच आवाहनाला दाद देत डॉ सुब्रमण्यम स्वामी यांच्या ८१ व्या वाढदिवसा निमित्त त्याच्या “विराट हिंदूस्थान संगम” या संस्थे मार्फत रुपये १३,०९,२७५ /- धनादेश संस्थेचे महाराष्ट्राचे विश्वस्थ श्री डॉ संखे, श्री हर्सोरा, श्री गधरी यांनी विश्व हिंदू परिषद कोंकण प्रांताचे प्रांतमंत्री रामचंद्र रामुका व प्रांत सहमंत्री श्रीराज नायर यांच्याकडे सुपूर्द केला.
@@AUTHORINFO_V1@@