“कोरोना विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतच झाला तयार”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2020
Total Views |

Ling me yan_1  
 
नवी दिल्ली : चीनमधून कोरोना विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगात पसरला. त्यानंतर जो हाहाकार झाला, तो सर्वश्रुत आहे. पण अनेकवेळा कोरोना विषाणूचा उगमाबाबत नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या. यापैकीच एक म्हणजे चीनच्याच विषाणूशास्त्रज्ञ ली-मेंग यॅन यांनी उपस्थित केलेली शंका. कोरोना विषाणू हा चीनमधील प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. यानंतर त्यांना देश सोडून जाण्यास सांगितले. त्यांनी पुन्हा एकदा हाच दावा अमेरिकेतील एका मुलाखतीमध्ये केला आहे.
 
 
जागतिक आरोग्य संघटना आणि चीननेही यॅन यांचा यापूर्वीचा दावा फेटाळून लावला होता. या नव्या मुलाखतीत यॅन यांनी सांगितले की, “चिनी लष्कराच्या प्रयोगशाळेत झोऊशान बॅट कोरोनाव्हायरस, झेडसी ४५ आणि झेडएक्स २१ हे विषाणू तयार करण्यात आले होते.” याबाबत त्यांचा वैद्यकीय अहवाल त्या लवकरच प्रकाशित करणार असल्याचेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले. चीनच्या लष्करानेच हा विषाणू तयार केल्याचा दावा यॅन यांनी यापूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही केला होता, ज्यानंतर त्यांना चीनमधून बाहेर काढण्यात आले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@