चीनी हेरगिरी : मोदी आणि राष्ट्रपतींसह १० हजार भारतीयांवर 'वॉच'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2020
Total Views |

Data mining_1  
 



बिजिंग : चीनी सरकारशी निगडीत एक मोठी डेटा कंपनी १० हजार भारतीयांची माहिती आणि संघटनांची हेरगिरी करत असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचा संपूर्ण परिवार, कित्येक कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचाही सामावेश आहे.
 
 
 
न्यायमूर्ती, व्यापार, क्रीडा, माध्यमे, सांस्कृतिक आणि स्थानिक आदी विविध क्षेत्रांतील प्रमुख चेहऱ्यांची चीन हेरगिरी करत आहे. तसेच कित्येक गुन्हेगार आणि आरोपींच्या माहितीचीही चोरी केली जात आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्सप्रेस'च्या संशोधनात हा खुलासा करण्यात आला आहे.
 

कोण आहेत चीनच्या निशाण्यावर ?
 
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
 
रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
 
जेपी नड्डा, भाजप अध्यक्ष
 
सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष
 
मनमोहन सिंह, माजी पंतप्रधान
 
राहुल गांधी, काँग्रेस नेते
 
प्रियंका गांधी, काँग्रेस नेत्या
 
बिपिन रावत, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ
 
एस. ए. बोबडे, सरन्यायाधीश
 
जी सी मुर्मू, कॉम्प्ट्रॉलर आणि ऑडिटर जनरल (CAG)
 
अमिताभ कांत, नीति आयोगाचे सीईओ
 
रतन टाटा, चेयरमन (एमेरिटस), टाटा ग्रुप
 
गौतम अदानी, चेयरमन, अदानी ग्रुप
 
सचिन तेंडुलकर, क्रिकेटर
 
श्याम बेनेगल, चित्रपट दिग्दर्शक
आठ केंद्रीय मंत्री
 
राजनाथ सिंह
 
निर्मला सीतारमन
 
रविशंकर प्रसाद
 
पीयूष गोयल
 
स्मृति इराणी
 
वी.के. सिंह
 
किरण रिजिजू
 
रमेश पोखरियाल निशंक
 
पाच मुख्यमंत्री
 
शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
 
अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान
 
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
 
अमरिंदर सिंह, मुख्यमंत्री, पंजाब
 
ममता बनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
 
सात माजी मुख्यमंत्री
 
रमन सिंह, छत्तीसगढ़
 
अशोक चव्हाण, महाराष्ट्र
 
के. सिद्धारमैया, कर्नाटक
 
हरीश रावत, उत्तराखंड
 
लालू प्रसाद यादव, बिहार
 
भूपिंदर सिंह हुड्डा, हरियाणा
 
बाबूलाल मरांडी, झारखंड
 
नेत्यांच्या नातेवाईकांचीही हेरगिरी
 
सविता कोविंद, राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या पत्नी
 
गुरशरण कौर, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह की पत्नी
 
झुबिन इराणी, केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांचे पती
 
सुखबीर सिंह बादल, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचे पती
 
डिंपल यादव, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी
 
 
तिन्ही सैन्याच्या माजी १५ प्रमुखांवरही लक्ष
 
 
एका अहवालानुसार, चीनच्या शेनझेन शहरातून झेन्हुआ डेटा इन्फोर्मेशन टेक्नॉलोजी कंपनीने भारतीयांचे रिअल टाईम मॉनिटरींग करत आहे. या कंपनीच्या निशाण्यावर असलेल्या भारतातील संघटना आणि लोकांचा डेटा मिळवला जात आहे. इंडियन एक्सप्रेसतर्फे दोन महिन्यांपर्यंत केलेल्या पाठपुरावा आणि संशोधनातून मिळणाऱ्या निष्कर्षावर हा दावा केला आहे. त्यानुसार, तिन्ही सैन्यदलांचे १५ माजी प्रमुख, अडीचशे ब्युरोक्रेट आणि डिप्लोमेट्स यांचीही ट्रॅकींग केली जात आहे.
 
 
भाजप आणि काँग्रेसच्या दोनशे नेत्यांची हेरगिरी
 
भाजप आणि काँग्रेसच्या दोनशे नेत्यांवर चीनची नजर असल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. डाव्या संघटनांच्या ६० आणि माजी आमदार व खासदार अशा एकूण १३५० राजकारण्यांवरही नजर ठेवली जात आहे. त्यात ३५० खासदारांचा सामावेश आहे.
 
 
हे डीप मायनिंग ऑपरेशन
 
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी यावर भाष्य केले आहे. हे चीनी सरकारचे डीप मायनिंग ऑपरेशन आहे. चीन आणि तिथल्या लष्कराने १० हजार भारतीयांवर वॉच ठेवला आहे. ही साधी सरळ गोष्ट नाही. चीनचा नेमका उद्देश काय, हा डेटा का वापरला जात आहे, त्याची कारणे आपण शोधायला हवीत, असेही ते म्हणाले.


@@AUTHORINFO_V1@@