घरकाम करणाऱ्या महिलांसाठी ४ टक्के व्याजदरावर कर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2020
Total Views |
MLA Atul Bhatkhalkar _1&n
 
 
 
मुंबई : घरकाम करणाऱ्या महिलांवर लॉकडाऊनचे संकट ओढावले आहे, त्यांना दिलासा देण्याच्या हेतूने पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू करण्यात आली आहे. जनकल्याण बँकेतर्फे १० हजारांचे कर्ज केवळ चार टक्क्यांवर उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा आज मुंबईत शुभारंभ करण्यात आला. भाजप आमदार अतुल भातखळकर आणि जलकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. एका दिवसात या योजनेअंतर्गत १७५ हून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी यावेळी ऑनलाईन प्रशिक्षणही देण्यात आले. प्रथम एज्युकेशन सोसायटी, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सीकोस्ट यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
 
 
 
घरकाम करणाऱ्या महिलांना तत्काळ मदत जाहीर करावी !
 
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारकडे महत्वपूर्ण मागणी केली आहे. लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्या घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी घरगुती कामगार मंडळाला तातडीने शंभर कोटींची मदत करावी, बंद असणारी घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी तातडीने सुरू करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
काय आहे ऑनलाईन प्रशिक्षण ?
कोरोनामुळे घरकाम करणाऱ्या महिलांचा रोजगार गेला आहे. मालकांनी संक्रमणाच्या भीतीमुळे त्यांना घरात प्रवेश देणे नाकारले आहे. परिणामी संसर्ग नियंत्रण, निर्जंतूकीकरण आणि सोशल डिस्टंसिंग आदी गोष्टींची माहिती देण्याची त्यांना गरज आहे. त्याअंतर्गत कोरोनापासून खबरदारी घेत कामे कशी सांभाळावी, याचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आत्तापर्यंत विभागातील १४० जणींनी त्यात सहभाग घेतला आहे. कोरोना काळात घरात येणाऱ्या पाहुण्यांचे आदरतीथ्य, सॅनिटायझेशनची यंत्रणा कशी वापरावी, मास्क-सॅनिटायझरचा वापर आदी गोष्टींची विस्तृत माहिती यावेळी देण्यात येणार आहे, अशी माहिती आ. भातखळकर यांनी दिली.




@@AUTHORINFO_V1@@