वाघ-पँथर-कंगना-एक कहाणी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2020   
Total Views |

kangana_1  H x

जेव्हा एखाद्या स्त्रीचा पराजय करता येत नाही, त्यावेळी तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा केली जाते. त्यातही तिच्या प्रेमप्रकरणावर आणि लैंगिकतेवर. याचे उत्तम उदाहरण द्यायचे तर अभिनेत्री कंगना राणावतचे आहे. भरीस भर म्हणजे एखाद्या खाष्ट सासूने सुनेशी बोलावे, तसेच राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण मुख्यमंत्री आणि कंगना वादात, कंगनाला म्हणाल्या की, ‘’गाशा गुंडाळून चालती हो.” असो, यावरून विद्या चव्हाण आणि त्यांच्या सूनबाईंचे वाद आठवले. आठवले वरून आठवले की, या सर्व गदारोळात महाराष्ट्राच्या रामदास आठवले यांनी कंगनाला संरक्षण दिले. ब्राव्हो रामदास आठवले. एका महिलेच्या संरक्षणासाठी आठवले आणि त्यांचे कार्यकर्ते पुढे आले. या भीमाच्या लेकरांनी नीतिमत्ता दाखवली. ‘वाघाचे एक था टायगर’ झाले आहे. मात्र, पँथर अजूनही पँथरच आहे हे रामदास आठवलेंनी दाखवून दिले. थोडक्यात कंगना-वाघ-पँथर-एक कहाणी...



दादा कोंडकेंच्या आत्मचरित्रातला एक प्रसंग, मध्यरात्र असते. अभिनेत्री उषा चव्हाण दादा कोंडकेंकडे हट्ट धरते की, माझी बाळसाहेब ठाकरेंशी आताच्या आता भेट घडवून द्या. हतबल होऊन दादा कोंडके त्या मध्यरात्री उषा चव्हाण यांची भेट बाळासाहेबांशी करून देतात. त्यावेळी बाळासाहेब दादा कोंडकेंना किंवा उषा चव्हाण यांना जे काही सांगतात ते वाचले की कळते की, बाळासाहेब बाळासाहेबच का होते? आणि त्यांच्या आदेशावर चालणारी त्यावेळची सेना ही ‘शिवसेना’च का होती. त्याही पुढचे असे की, बाळासाहेब ठाकरेंनी त्या रात्रीचा उल्लेख, किंवा दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांचे जगणे याबाबत कुठेही सार्वजनिक स्तरावर काही बोलून त्यांच्या वैयक्तिक प्रेमप्रकरणावर किवा लैंगिक आयुष्यावर बोलल्याचे निदान माझ्या वाचनात नाही. आज हे सगळे आठवण्याचे कारण की, कंगना राणावत.



आज कंगना राणावत आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांमध्ये भयंकर वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कंगना राणावत यांना विरोध करणारे तिच्या संदर्भात प्रसारमाध्यमातून तिच्या वैयक्तिक जीवनाचे वाभाडे काढत आहेत. अर्थात, ती अभिनेत्री आहे आणि सध्याच्या तिच्या समाजकारणात किंवा राजकारणात तिचे काही वैयक्तिक अजेंडेही असू शकतात. पण, तरीही तिने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर न बोलता तिचे अश्लील मिम्स तयार करणे, त्यावर घाणेरडे कमेंट करणे किंवा अहमदनगरमध्ये तर एका मुतारीलाच तिचे नाव देणे हे सगळे पाहिले की वाटते, ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच. जेव्हा एखाद्या स्त्रीचा पराजय करता येत नाही, त्यावेळी तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा केली जाते. त्यातही तिच्या प्रेमप्रकरणावर आणि लैंगिकतेवर. याचे उत्तम उदाहरण द्यायचे तर अभिनेत्री कंगना राणावतचे आहे. भरीस भर म्हणजे एखाद्या खाष्ट सासूने सुनेशी बोलावे, तसेच राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण मुख्यमंत्री आणि कंगना वादात, कंगनाला म्हणाल्या की, ‘’गाशा गुंडाळून चालती हो.” असो, यावरून विद्या चव्हाण आणि त्यांच्या सूनबाईंचे वाद आठवले. आठवले वरून आठवले की, या सर्व गदारोळात महाराष्ट्राच्या रामदास आठवले यांनी कंगनाला संरक्षण दिले. ब्राव्हो रामदास आठवले. एका महिलेच्या संरक्षणासाठी आठवले आणि त्यांचे कार्यकर्ते पुढे आले. या भीमाच्या लेकरांनी नीतिमत्ता दाखवली. ‘वाघाचे एक था टायगर’ झाले आहे. मात्र, पँथर अजूनही पँथरच आहे हे रामदास आठवलेंनी दाखवून दिले. थोडक्यात कंगना-वाघ-पँथर-एक कहाणी...


टोटल फेल, कहा गये वो लोग


नाही नाही संविधान खतरे में नाही. इनटॉलेरन्स तर अजिबात नाही. आमच्या तमाम पुरोगामी विचारवंतांनी ‘भीती वाटते’ असे पत्रक कुठे काढले आहे? आमच्यातल्या साहित्यिकांनी पुरस्कारसुद्धा परत केले नाहीत. (हो तसे कुठे ते त्यांच्या कष्टाचे आहेत. ओळखी पाळखीने मिळवलेले पुरस्कार ते. असे मी नाही हो, लोक म्हणतात) काहीही झाले की ‘तुम्हारे टुथपेस्ट में नमक है क्या’ या जाहिरातीमध्ये जसा नमक है क्या विचारणारा व्यक्ती अचानक टपकतो, तसेच ‘संविधान खतरे में हैं, असहिष्णुता वाढली, आम्हाला भीती वाटते’ वगैरे वगैरेचे रडगाणे गाणारे लोक टपकत असतात; अर्थात त्यांना वाटते की ते अचानक टपकतात. पण, बाकीच्या जनतेला माहिती असते की, येणार येणार ही पुरोगामित्वाच्या नावाने स्वार्थांधाची लाळ गाळणारी टोळधड येणार. पण, ही टोळधड फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, रा. स्व. संघ, भाजप, देेवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खोटा आकांडतांडव करण्यासाठीच असते बरं का? इतरवेळ त्यांच्या अभिव्यक्तीला सद्गती मिळालेली असावी.असो, आज महाराष्ट्रात लोक आरोग्य सुविधेअभावी किड्या-मुंगीसारखे मेले. कंगना विरुद्ध सत्ताधारी पक्षातले नेते दुश्मनीचा आखाडा रंगला. निवृत्त सैनिकाला निर्लज्ज आणि निर्दयपणे मारहाण झाली. करमुसे प्रकरण, वाधवान प्रकरण, पालघर साधू हत्याकांड या सगळ्यांचे गुन्हेगार मस्त मजेत असावेत आणि पीडित मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत. पण, याबाबत सत्यपरिस्थिती लोकांसमोर मांडायला ना कुणी डफली घेऊन आंदोलन केले, ना कोणी मोर्चे काढले. ना कुठे विचारवंतांनी चर्चासत्राचा धडाका लावला. अमोल पालेकर, नसरुद्दिन शाह, शबाना आझमींपासून, खान मंडळींचे कुटुंबीय, कन्हैयाकुमार, गेला बाजार, स्वरा भास्करही कुठे गायब झाले? यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य शाबित आहे की मरून गेले? तिकडे दिल्लीतही सोनिया मॅडम आणि त्यांचे युवराज नेहमी कंठशोष करतात की, “लोकटंट्र की हतया, संबिढान खटरे मे हे.” मग त्यांचीच सत्ता असलेल्या महाराष्ट्राबाबत मॅडमचे काय बरं मत असावे? दुसरीकडे पवार काकांच्या पुरोगामित्वाचे काय झाले, काही पत्ता नाही. थोडक्यात महाराष्ट्रात सत्ताधारी नेत्यांचे आलबेल आहे आणि जनतेचे जगणे टोटल फेल आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची टिमकी मिरवणारे कुठे आहेत? कहा गये वो लोग?
@@AUTHORINFO_V1@@