केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा एम्समध्ये दाखल!

    13-Sep-2020
Total Views |
Amit shaha_1  H


श्वसनास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल!

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील एम्समध्ये काल रात्री अकराच्या सुमारास त्यांना दाखल करण्यात आले. श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना १८ ऑगस्टला दिल्लीतील एम्समध्ये दाखल केले होते. अमित शहा यांना बर्‍याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे.


कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शहा यांना २ ऑगस्ट रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. अमित शाह यांनी स्वत:च ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती. आपल्या ट्वीटमध्ये अमित शाह म्हणाले, आज माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार. हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने जे केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.


याआधी अमित शहा यांना १८ ऑगस्टला पुन्हा नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्त्वात अमित शाह यांच्यावर उपचार सुरु होते.