महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2020
Total Views |
uddhav_1  H x W


मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून राजकारणावर बोलेन!

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून आपण विचित्र परिस्थितीचा सामना करत आहोत. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील सर्व जनतेचे आभार मानले आहे. या अडचणीच्या काळात नागरिकांनी साथ दिली. सर्व धर्मियांनी आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेत संयम पाळल्यामुळे जनतेचे आभार मानले.


महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून मी या राजकारणावर देखील बोलणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जात आहे. त्याविषयी मी बोलेन पण आता नाही, वेळ आल्यावर मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून मी राजकारणावर बोलेन पण माझे अधिक लक्ष कोरोनावरच असणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


‘कोरोना संकट आक्राळविक्राळ रुप धारण करेल की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही अशाच इशारा दिला आहे. घाबरण्याचे काम नाही, मात्र, जबाबदारीने वागले पाहिजे. मी आधी तुम्ही खबरदारी घ्या, सरकार जबाबदारी घेईल असे म्हटले होते. मात्र, आता मी काही जबाबदारी तुमच्यावरही देत आहे. पुढील काळात एक मोहिम सुरु करण्यात येत आहे. ही मोहिम आहे माझे कुटुंब, माझी जबाबदारी. महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्म, पंथातील नागरिकांनी एकत्रित येऊन या मोहिमेत सहभागी व्हावे. तोंडावर मास्क सेल्फ डिफेन्ससाठी महत्त्वाचे आहे. लस कधी येणार याविषयी खूप चर्चा चर्वणं होत आहेत. मात्र, डिसेंबरपर्यंत लस येईल अशी आपल्याला आशा आहे. तोपर्यंत सातत्याने मास्कचा वापर करावा. कारण नसताना बाहेर पडू नका. बाहेर पडताना अंतर ठेवा आणि मास्कचा वापर करा,” असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.



@@AUTHORINFO_V1@@