राज्य कायद्याचे की एका 'बबड्या'च्या फायद्याचे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2020
Total Views |

Ashish shelar_1 &nbs



भाजप नेते आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला!


मुंबई : निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्यानंतर यावर बोलताना शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले की, ‘ महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही.’ यावरून भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.


हे कायद्याचे राज्य आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?, असा टोला आशिष शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलिसांवर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांना मारहाण, पक्षाची भूमिका काय? तर म्हणे, संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, पण, इथे कायद्याचे राज्य आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?, असे ट्विट आशिष शेलारांनी केले आहे.








दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. आरोपींमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम यांचाही समावेश आहे.




@@AUTHORINFO_V1@@