युवा संगीतकार आदित्य पौडवाल यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2020
Total Views |
aditya _1  H x

मूत्रपिंड विकाराच्या उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास!

मुंबई : युवा संगीतकार आणि प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल यांचे निधन झाले. ते अवघ्या ३५ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर घरीच उपचार चालू होते. त्यातूनही आदित्य आपले संगीताचे काम करत होतेच. अगदी दोन दिवसांपूर्वीपर्यंत कार्यरत असणाऱ्या आदित्य यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीतक्षेत्राला धक्का बसला आहे.


सुप्रसिद्ध संगीतकार अरुण पौडवाल आणि गायिका अनुराधा पौडवाल यांना आदित्य आणि कविता ही दोन अपत्ये. कविता गायनात प्रवीण आहे. तर, आदित्यने मात्र आपल्या वडिलांचा वसा पुढे नेला. आदित्य कधीच चर्चेत नसायचे पण त्यांचे काम मात्र चालू होते. अनुराधा यांच्या अनेक अध्यात्मिक गाण्यांना आदित्यनी स्वरसाज चढवला आहे. या गणपतीमध्ये त्यांनी अनुराधा पौडवाल यांच्यासोबत उमागणपती नावाचे गाणे रसिकांच्या भेटीस आणले होते. त्यातल्या त्यांच्या वाद्यसंरचनेचे खूप कौतुकही झाले. काळापुढचा विचार त्यांच्या संगीतात होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘साहेब तू’ या गाण्याचे प्रोड्युसर म्हणूनही आदित्यंनी काम केले होते.



@@AUTHORINFO_V1@@