ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीने घेतली बॉलीवूड अभिनेत्रींची नावे!

    12-Sep-2020
Total Views |
rhea_1  H x W:



सारा अली खान, रकुल प्रीत सिंगसह २५ सेलिब्रेटी अडकणार?


मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह ६ लोकांना अटक केली आहे. माहितीनुसार रिया चक्रवर्तीने एनसीबी समोर ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींची नावे घेतली आहेत. शौविक आणि रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून देखील याबाबत माहिती मिळाली आहे. रियाने नाव घेतल्याने अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा ही नावे आता एनसीबीच्या रडारवर आली आहेत.


रियाने एनसीबीला दिलेल्या १९ पानी निवेदनात विशेषत: सारा, रकुल आणि सिमोन या तिघींची नावे दिल्याचा दावा आहे. या प्रकरणात २५ ए ग्रेड बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे घेण्यात आली आहेत, ज्यात अभिनेते, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर, प्रॉडक्शन हाऊस आणि इतरांचा समावेश आहे. एनसीबी आता अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीतील ए, बी आणि सी ग्रेड कलाकारांवर लक्ष केंद्रित करण्याची चिन्हे आहेत.


बॉलीवूड सेलिब्रिटी ड्रग्ज घेत असल्याची माहिती रियाने एनसीबीला दिली आहे. याच माहितीच्या आधारे आज एनसीबी मुंबई गोव्यामध्ये छापे टाकत आहे. तर शौविकने ड्रग्जसाठी रिया कधी कधी आपल्या अकाउंट मधून पैसे देत असल्याची कबुली दिली तर सॅम्युअलने सुद्धा या माहितीला दुजोरा देत रियाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. सॅम्युअल आणि शौविक दोघांनीही रिया ही सुशांतसाठी ड्रग्ज मागवत असल्याची कबूली दिली आहे. तसंच दोघांनी सुशांतच्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर व्हायचा आणि कोण कोण त्याचे सेवन करायचे याचीही माहिती दिली आहे.