पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Sep-2020
Total Views |
Aashish shelar_1 &nb

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण; आशिष शेलारांची शिवसेनेवर उद्विग्न टीका

मुंबई : निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या घटनेवरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला.


“कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री..टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगणाचे घर तोडलेत.. आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण! निषेध!! पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी?” असे ट्विट शेलार यांनी केले आहे.






कांदिवली इथे राहणारे माजी नौदल अधिकारी मनोज शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असलेले व्यंगात्मक कार्टून फॉरवर्ड केले म्हणून त्यांच्या घरात घुसून शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली. कंगना आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला असतानाच शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. अटक करण्यात आलेल्या सहा जणांमध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख कमलेश कदम आणि कार्यकर्ता संजय मांजरे यांचा समावेश आहे.


@@AUTHORINFO_V1@@