भारत-चीन तणाव कमी करण्यासाठी पंचसूत्री फॉर्म्युला ठरला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2020
Total Views |

russia_1  H x W



मॉस्को :
भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियातील मॉस्कोमध्ये सुरु असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही देश सीमेवरील तणाव कमी करण्याच्या मुद्दयावर सहमत झाले. भारत आणि चीनदरम्यान तणाव कमी करण्यासाठी एका पंचसूत्रीवर सहमती झाली आहे.अडीच तासाच्या या बैठकीत दोघांनी पाच मुद्यांवर सहमती दर्शविली, वाटाघाटीचे एकमेव लक्ष्य म्हणजे सीमेवरील ताणतणाव कमी करणे आणि स्टँडऑफच्या जागेवरुन सैन्य काढून घेणे.



मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यातील बैठक काल रात्री आठ वाजता काँग्रेस पार्क वोलकोंस्की हॉटेलमध्ये सुरु झाली. ही बैठक जवळपास रात्री १०:३० वाजता संपली. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी हे स्पष्ट केले आहे की एलएसीवरील सद्यस्थितीत असणारा तणाव भारताला वाढवायचा नाही आणि चीनविषयीच्या भारताच्या धोरणात कोणताही बदल होणार नाही. त्याचवेळी चिनी परराष्ट्रमंत्री वोंग यी यांनी सांगितले की असे कोणतेही आव्हान नाही जे चर्चेतून सोडवता येणार नाही.


भारत-चीनदरम्यान या पंचसूत्रीवर झाली सहमती

-आपापसातील मतभेदांचं वादात रुपांतर होऊ दिलं जाणार नाही

-दोन्ही देशांचं सैन्य विवादित क्षेत्रातू वापस घ्यावं
-निश्चित केलेल्या नियमांनुसार दोन्ही देशांमधील बातचीत सुरु ठेवावी

-सध्याच्या संधी आणि प्रोटोकॉल्स दोन्ही देश मानणार

-दोन्ही देश असं कुठलंही पाऊल उचलणार नाही ज्याने तणाव वाढेल
@@AUTHORINFO_V1@@