‘मन की बात’ डीसलाईक मागे कॉंग्रेसचा हात : भाजप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2020
Total Views |

PM Modi_1  H x
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम व्हिडियो भाजपने युट्युबवर पोस्ट केला. त्यानंतर या व्हिडियोवर जास्त डीसलाईक आले. 'डिसलाइक' करणाऱ्यांमध्ये ९८ टक्के विदेशीतील नागरिक आहेत आणि यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
 
 
“गेल्या २४ तासांत युट्यूबवर 'मन की बात' व्हिडिओला डिसलाइक करण्याचा संघटीत प्रयत्न झाला. कॉंग्रेसचा आत्मविश्वास इतका कमी आहे की त्यांनी विजय झाल्यासारखे ते साजरा करत आहेत. पण डिसलाइकपैकी फक्त २ टक्के नागरिक हे भारतातील आहेत. हे यूट्यूबच्या डेटावरून दिसून येत आहे,” असे भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करून सांगितले.
 
 
“नेहमीप्रमाणे उर्वरित ९८ टक्के हे भारताबाहेरील आहेत. विदेशातील काही ट्विटर अकाउंटस कॉंग्रेसच्या जेईई-नेटविरोधी मोहिमेचा कायमचा भाग राहिले आहेत. राहुल गांधींच्या तुर्कीतील बॉट्सची सक्रियता खूप वाढली आहे. राहुल गांधींना तुर्कीचा एवढा पुळका का आहे? प्रादेशिक आणि इतर विभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉंग्रेस अनेक हँडल्सनी 'मन की बात'चा व्हिडिओ 'डिसलाइक' करण्यासाठी मोहीम राबवली होती,” असे आरोप मालवीय यांनी केले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@