भारत- चीन सीमेवर तणाव ; संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2020
Total Views |

China_1  H x W:
 
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून लडाखमधील भारत-चीन सीमेवर तणाव सुरू आहे. गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीनंतर सीमेवर पुन्हा आता नव्याने तणाव निर्माण झाला आहे. चीनने भारतीय भूमीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कराने चिनीचा प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य सतर्क झाले असून रणगाडेही फायरिंग रेंजमध्ये आहेत. याचदरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी सीमेवरील संवेदशील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
 
 
दोन्ही देशांमध्ये सीमावादासंबंधी लष्करी कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र, चीनच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे चर्चेचे घोंगडे भिजत पडले आहे. सीमारेषेवरील वादावर अंतिम तोडगा निघाला नसतानाही २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या होत्या. सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न चिनी लष्कराने केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. चीनने आता भारतानेच घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे.
 
 
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सध्या दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस प्रमुख बिपीन रावत, लष्करप्रमुख एम.एम. नरवणे आणि लष्कराच्या विशेष मोहिमांचे संचालक उपस्थित आहेत. यामध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले असल्याची माहिती देण्यात येत आहे. भारताच्या पुढील रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये भारत चीनच्या सिमाप्रश्नांवर काय तोडगा काढतो याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@