राहुल गांधी यांना अध्यक्ष बनायचे नसेल तर...; काँग्रेस नेत्यांची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2020
Total Views |

congress_1  H x


नवी दिल्ली :
काँग्रेसला आपली प्रतिमा वाचवण्यासाठी आता पक्षाचा पूर्णवेळ अध्यक्ष निवडावाच लागेल, असे मत काँग्रेसच्या नेत्यांनी मांडले आहे. काँग्रेस हा दिशाहीन झालेला पक्ष आहे, अशी पक्षाची प्रतिमा बनली आहे. ही प्रतिमा तोडण्यासाठी आता पूर्णवेळ अध्यक्ष निवडणे आवश्यक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष आहेत. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न अनुत्तरित असून अध्यक्ष निवडीचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. याच दरम्यान अध्यक्ष निवडीच्या मागणीने काँग्रेसमध्ये जोर वाढला आहे. काँग्रेस पक्ष हा भरकटलेला पक्ष आहे, तसेच तो राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यासही सक्षम नाही, अशी काँग्रेस पक्षाची जनतेत झालेली प्रतिमा सुधारणे आवश्यक आहे, असे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचे म्हणणे आहे. तसेच,पक्षाला लवकरात लवकर लोकशाही पद्धतीने पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची गरज आहे आणि निवडप्रक्रिया सुरू केली पाहिजे. काँग्रेस पक्षाला संघटनेच्या स्तरावर पुन्हा उभे करू शकेल इतकी शक्ती विजेत्या उमेदवाराला मिळायला हवी, असेही थरूर यांनी म्हटले आहे.



तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष व्हायचे नसेल तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची निवड करायला हवी असे म्हंटले आहे. तसेच काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांना काँग्रेस अध्यक्ष निवडीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी उत्तर देताना अध्यक्ष निवडीवर लवकरात लवकर निर्णय घेऊन नवीन अध्यक्ष निवडला जावा. ही अनिश्चितता राहायला नको. यामुळे नुकसान होऊ शकते अशी मागणी केली. "सध्या आमची परिस्थिती वाईट आहे. गांधी कुटुंबाच्या बलिदान, काम यामुळेच सर्वांना राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी असं वाटतं आणि हे साहजिक आहे. यात चुकीचं काहीच नाही. पण त्यांना अध्यक्षपदावर यायचं नसेल तर यावर लोकशाही पद्धतीने तोडगा काढायला हवा" असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
@@AUTHORINFO_V1@@